नागपूर : उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात एकही विकासाचे काम केले नाही. आमच्यासोबत असताना संघ विचारावर चालत होते. मात्र आथा ते शरद पवार यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बिघडले आहे. त्यांना विस्मृतीचा रोग झाला आहे. आधी संघ कसा श्रेष्ठ असे सांगणारे उद्धव ठाकरे आता स्टॅलिन, शरद पवार, राहुल गांधी यांचे प्रवक्ते झाले आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांचे विजयादशमी झालेले भाषण रडणारे होते. त्यांच्या भाषणातून त्यांना नैराश्य आले असल्याचे वाटत होते. ते सोन्याचा चमचा घेऊन बदामाचे दूध पिणारे नेते आहे त्यामुळे त्यांना गरिबांच्या व्यथा काय कळणार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे स्टॅलिनसोबत राहणार का असा सवाल त्यांना केला होता मात्र याबाबत त्यांनी खुलासा केला नाही. हिंदू संस्कृतीवर टीका करणाऱ्यासोबत ते राहतात त्यामुळे हिंदुत्वाबाबत बोलू नये. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये बेइमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यामुळे बेईमानी करुन जे मिळवले ते टिकत नाही. उद्धव ठाकरे यांची कृती हे खरेत र हिंदू राष्ट्रहित विरोधी आहे. त्यांच्या त्रासाला कंटाळून एकनाथ शिंदे आणि ४० आमदार त्यांना सोडून गेले. शरद पवार यांनी बहुमत सोबत असताना बेइमानी केली म्हूणन घरातला माणूस त्यांना सोडून गेला असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा >>>“सरकार आंधळं, बहिरं, बधीर झालेलं…”, मराठा आरक्षणावरून नाना पटोले आक्रमक
निलेश राणे नाराज नाही आणि त्यांना कुठल्याही लोकसभेची अपेक्षा नाही. उलट पक्षामध्ये व्यक्तिगत निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. पक्षाकडून जो आदेश येईल तो निलेश राणे मानतील आणि शंभर टक्के सक्रिय काम करतील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे अशी एकमुखी मागणी केली आहे. भाजपचीही तीच मागणी आहे. मात्र कुणा समाजावर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांना साक्षी मानून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे त्यामुळे सरकारने दिलेले वचन पूर्ण करेल. जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवत उपोषण करु नये अशेही बावनकुळे म्हणाले.