लोकसत्ता टीम

नागपूर : काँग्रेससारखा नाटक (नौटंकी) करणारा पक्ष आजपर्यत बघितला नाही. जसा रंगमंचावर नाच्या असतो तशी काँग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनेमुळे सध्या महाविकास आघाडी रडकुंडीला आली आहे. त्यामुळे चांगल्या काही योजना आणल्या तर त्याला विरोध करणे हे विरोधी पक्षाचे काम झाले असल्याचे टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Vijay Wadettiwar, Congress, Vijay Wadettiwar news,
वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Eknath Shinde, reservation,
Eknath Shinde : आरक्षण रद्द करणाऱ्यांविरोधात आम्ही उभे राहू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram join sharad pawar NCP
गडचिरोली : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील राजकीय संघर्ष; आत्राम कुटुंबातील फुटीमुळे…
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
Uddhav Thackeray, Sangli meeting, Shivsena,
सांगलीच्या मेळाव्याकडे उद्धव ठाकरे यांची पाठ, शिवसेना जाणीवपूर्वक दूर
Assembly Election 2024 NCP Congress Ajit Pawar Group BJP Uddhav Thackeray Group
अजित पवार गटामुळे भाजपला गळती?
Sharad Pawar, NCP, Chief Minister, Maha Vikas Aghadi, Uddhav Thackeray, Shiv Sena, Congress, Sanjay Raut,
मुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांच्या भूमिकेने महाविकास आघाडीतील तिढा वाढला

गंगाधराव फडणवीस मेमोरियल डायग्नोसीस फिरता दवाखानाचे लोकार्पण बावनकुळे यांच्या करण्यात करण्यात आले, या लोकार्पण कार्यक्रमानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसच्या काळात जी कामे झाली नाही ती सर्व कामे केंद्र व राज्य सरकार आता पूर्ण करत आहे. काँग्रेसचे अर्थसंकल्पाविरोधातील आंदोलन म्हणजे एक प्रकारे नाटकच आहे. लोकसभा निवडणुकीत खटाखटा पैसे देऊ म्हणून काँग्रेसने महिलांची फसवणूक केली आहे. उद्धव ठाकरे यांना अर्थसंकल्प समजत नाही हे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे त्यामुळे अर्थसंकल्पावर सामनातून केलेल्या टीकेला काहीच अर्थ नाही.

आणखी वाचा- वर्धा : परवाना रद्द ते आता ऑनलाईन व्यवहार करण्यास सज्ज! असा आहे ‘या’ बँकेच्या वाटचालीचा यशस्वी प्रवास

शिवाय राष्ट्रवादी कांग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना मोदीवर टीका केल्याशिवाय झोप येत नाही. त्यामुळे आपण काही करायचे नाही आणि दुसऱ्यांनी काही चांगले केले तर त्याला विरोध आणि टीका करायची हा विरोधी पक्षाची सवय झाली नाही. लोकसभा निवडणुकीत खोटे बोलून जनतेची मते घेतली आणि हा खोटारडेपणा जनतेसमोर आला आहे. मात्र आता विधानसभा निवडणुकीत केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल असेही बावनकुळे म्हणाले.

महाराष्ट्रासाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे राज्याला काही मिळाले नाही या विरोधकांच्या टीकेला काही अर्थ नाही. त्यांनी केंद्राचा अर्थसंकल्प समजून घेतला नाही. काँग्रेसने खोटारेडपणा करुन मते मिळवली असली तरी आम्ही मात्र लाडली बहीण योजना जाहीर करुन त्या माध्यमातून आता महिलांच्या खात्यात वर्षाला अठरा हजार रुपये जमा होणार आहे.

आणखी वाचा-पूजा खेडकर प्रकरणानंतर ‘एमपीएससी’कडून वैद्यकीय तपासणीचे धोरण निश्चित, जाणून घ्या सविस्तर…

आम्ही पाच वर्षेचे नियोजन केले आहे त्यामुळे प्रत्येक विभागाला निधी मिळणार असून तो कुठेही कमी करण्यात आला नाही. प्रत्येक विभागाचा पैसा हा द्यावा लागतो. काँग्रेस पक्ष आता रडकुंडीला आला आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीत आपले कसे होईल याची भिती वाटायला लागली आहे त्यामुळे आंदोलन केली जात असल्याचे बावनकुळे म्हणाले. काँग्रेसने ५५ वर्षात काही केले नाही तर जनतेला कन्फ्युज करत मत घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारतासाठी काम करत आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले तर हे केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना बंद करतील. त्यामुळे शेतकरी, महिला व युवकांवर अन्याय होील. उद्धव ठाकरे यांचे अडीच वर्ष सरकार असताना त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना बंद केल्या होत्या. त्यामुळे आगामी महाविकास आघाडीला विधानसभेत खोटे बोलून मत घेता येमार नाही असेही बावनकुळे म्हणाले.

करोनाच्या काळात उद्धव ठाकरे सरकार झोपले होते मात्र त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांसाठी अनेक वैद्यकीय सोयी सुविधा निर्माण करुन दिल्या होत्या असेही बावनकुळे म्हणाले.