नागपूर : शिंदे- फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य सरकार विकासाची भूमिका मांडत असताना विरोधी पक्षातील नेते मात्र बॅनरबाजी करत आम्हीच योजना आणल्याचा आव आणत आहे.मुले कोणाची, बारसे कोण करतय आणि लाडू कोण खात आहे. त्यामुळे जनसंवाद योजनेच्या माध्यमातून लोकापर्यंत शासनाच्या योजना पोहचवणार असल्याचे मत भारतदीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. विरोधी पक्षातील नेते सरकारच्या योजना आम्ही आणल्या आहे असा आव आणून आपआपल्या मतदार संघात बॅनरबाजी करत आहे. काही नेते तर आम्हीच योजना आणली असे सांगत मतदार संघात जात आहे. मुले कोणाचे बारसे, कोण करत आहे लाडू कोण खात आहे. त्यामुळे आम्ही ठरवले आहे की जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिंदे- फडणवीस आणि अजित पवार सरकारच्या योजना गावागावात पोहोचवाच्या आणि त्यादृष्टीने महायुती म्हणून नियोजन केले असल्याचे बावनकुळे म्हणाले.
ओबीसी- मराठा समाजामध्ये सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे यासाठी राज्यातील सर्व पक्ष व विधिमंडळ मराठा समाजाच्या पाठीशी आहे. सोबतच ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी काँगेस नेते आणि शरद पवार यांची असलेली भुमिका स्पष्टपणे येत नाही. सर्व पक्षीय बैठकीत महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला होता त्यामुळे त्यांची ओबीसी व मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट नाही. त्यांना दोन समाजात वाद निर्माण करायचे असतील. त्यामुळे त्यामुळे छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेण्यासाठीघेतलेला पुढाकार योग्य आहे. महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी घेतलेला हा पुढाकार आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांची विनंती शरद पवार मान्य करतील असे आम्हाला वाटत आहे.
अजित पवार यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष २८८ जागावर सर्वेक्षण करणार असतील त्यावर यावर कुणाचे दुमत नाही, पण महायुतीचा फार्मूला आहे. ज्या ठिकाणी जो जिंकून येईल त्यासाठी आम्हाला महायुती म्हणून जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कोणती जागा कोणाला यापेक्षा महायुतीचा जागा उमेदवार जिंकणे आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.
हेही वाचा…अतिवृष्टीचे तांडव! खामगावात ८३८ हेक्टर जमीन खरडली,२४२ कुटुंब बाधित…
सुजय विखे हे माजी खासदार होते, अशा ठिकाणी या चर्चेला काही अर्थ नसतो. सुजय विखे यांनी गेल्या पाच वर्षात उत्कृष्ट काम केले आहे, ती भाजपची जागा असल्याने तिथे अदलाबदलीचा प्रश्न नव्हता आणि येतही नाही. त्यामुळे या जागेबाबत काही आक्षेप घेतला जात असेल जर तर काही अर्थ नाही. नवाब मलिक उमेदवारी द्यावी की नाही हा अजित पवार यांचा प्रश्न आहे मात्र त्यावर तीनही पक्ष मिळून एकत्र चर्चा करणे गरजेचे आहे असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा…गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यात मुसळधार पाऊस; विज पडून म्हैस ठार
शिंदे, फडणवीस – अजित पवार गटाने लाडकी बहीण योजना आणली असून काही नेते मात्र मोठे बॅनर लावून जसे यांनीच लाडकी बहिण योजना आणली असल्याचे दाखवत आहे. गेल्या अडीच वर्षात सरकारमध्ये असताना कधीच अशी योजना आणली नाही. केवळ आम्ही ज्या योजना सुरू केल्या होत्या त्या बंद करुन नव्याने काही योजना सुरू केल्या नाही अशी टीका त्यांनी केली.