लोकसत्ता टीम

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार करीत आहेत. खरे तर महाराष्ट्राचे ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे वेगळे-वेगळे आंदोलन निर्माण करून समाजा-समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मात्र, त्यांच्याकडून दंगल घडवण्याची भाषा का केली जाते? त्यांच्या मनात काय आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

चंद्रशखेर बावनकुळे सोमवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ओबीसी व मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शरद पवार यांनी मध्यस्थीची भूमिका घेण्याची गरज आहे. मात्र ते निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा बोलू लागले आहे. हे राज्यासाठी चांगले नाही. जनता सुज्ञ आहे. शरद पवार यांची आरक्षणाबाबत नेमकी भूमिका काय आहे, हे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. आम्ही आरक्षणाबाबत आजही त्यांच्याशी चर्चा करायला तयार असून त्यांनी राज्याचे ज्येष्ठ नेते म्णून पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी समाजा-समाजातील तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना थांबविण्यासाठीसुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे जनतेला कळले पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.

आणखी वाचा- नागपुरात घरात पाणी, संतप्त नागरिकांनी रस्ताच तोडला

राज्य सरकारने आरक्षणाबाबत बैठक बोलिवली असताना विरोधी पक्षातील आणि काँग्रेसचे नेते बैठकीला गेले नाही. केवळ बाहेर सरकारवर टीका करुन राजकारण करत आहेत. काँग्रेसने समाजात तेढ निर्माण करून वाद केला आहे आणि आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवला आहे. यासाठी काँग्रेसच जवाबदार असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.

महायुतीचे सर्व नेते एकत्र बसून निर्णय करीत असल्यामुळे जनतेला त्याचा लाभ होतो आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येईल. आमचे सरकार गरीब कल्याण योजना राबवणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. ॲड. प्रकाश आंबेडकर हे राजकारणासाठी बोलत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खलनायक केले जात आहे. फडणवीस यांची मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका प्रामाणिक आहे, मात्र त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षाचे लोक करत आहे. पण लोक सुज्ञ असून त्यांना माहिती आहे.

आणखी वाचा-वर्धा : मातृत्वाचा सौंदर्यपूर्ण सोहळा! गर्भवती महिलांचा ‘फॅशन शो’मध्ये ‘रॅम्प वॉक’

अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दबाव आणला, असे ते बोलत आहेत. मग त्यांनी तेव्हाच कारवाई का केली नाही. ते आता अडीच वर्षानंतर संभ्रम निर्माण करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कदम समितीने स्वतः खुलासा केला आहे. अनिल देशमुख यांनी एवढे राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला पाहिजे, त्यातच त्यांचे भले आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. ज्या भागात नुकसान झाले आहे, तेथील सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जे काही करता येईल ते काम करीत आहोत. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या प्रत्येकाला सर्वेक्षणानंतर मदत केली जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

Story img Loader