भंडारा : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ च्या निवडणुकीपर्यंत भाजपविरूद्ध बातम्या प्रकाशित होऊ नये याची काळजी घेण्यासाठी ‘पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या’ असा सल्ला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना एका बैठकीत दिला. चंद्रशेखर बावनकुळे हे पत्रकारांची विशेष काळजी घेत असल्यामुळे त्यांचे ऋण फेडण्यासाठी भंडाऱ्यातील पत्रकारांनी त्यांना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता साईकृपा ढाबा, कवडशी फाटा, नागपूर रोड शहापूर येथे जेवणासाठी निमंत्रण दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> वर्धा : पर्यावरणप्रेमी गणेशभक्तांची गणेश विसर्जन केंद्रास पसंती; नद्या, तलाव ओस

आज सर्व पत्रकारांनी खासदार सुनील मेंढे यांच्या घरी जाऊन खासदारांच्या माध्यमातून चंद्रशेखर बावनकुळे यांना भंडाऱ्यात जेवणासाठी निमंत्रण पत्रिका दिली. या निमंत्रण पत्रिकेत चहा आणि जेवणाची व्यवस्था केलेली असून जेवणात बावनकुळे यांच्या आवडीनुसार मेन्यू राहील तसेच त्यांना अपेक्षित पाण्याचीही व्यवस्था केली असल्याचे नमूद केले आहे. जेवणाचे संपूर्ण बिल देण्यासाठी पत्रकार सक्षम असल्याचेही यात स्पष्ट केले आहे. या शिवाय धाब्यावर जेवनासाठी येताना खासदार सुनील मेंढे, भाजपचे भंडारा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे , शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर यांनाही बावनकुळे यांनी सोबत आणावे असे पत्रकारांनी सुचविले आहे. निमंत्रण पत्रिका देतेवेळी भंडाऱ्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp state president chandrashekhar bawankule invite journalists from bhandara at dhaba for dinner ksn 82 zws