वर्धा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हाश हुश करीत वर्ध्यात पोहोचले तेव्हा रात्रीचे नऊ वाजून गेले होते. सकाळी नांदेडवरून निघाल्यानंतर ठिकठिकाणी त्यांनी सभा घेतल्या. रात्री वर्ध्यात शेकडो बूथप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, वॉरियर त्यांची वाट बघत ताटकळत बसले होते. शेवटी मार्गदर्शन सत्र सूरू झाले.

बावनकुळे म्हणाले की आपण बूथवरून लढाई लढतो. बूथप्रमुख हे आपले शक्तीस्थान आहे. त्यांनी दिलेले काम चोख पार पाडले तर विजय आपलाच समजा. आणि हे निश्चित घडणार. वर्धा मतदारसंघातून ४० हजार मतांचे लीड मिळणार. कारण येथील आमदार डॉ. पंकज भोयर यांची मतदारसंघात पकड आहे. भाजपचे राज्यातील जे पहिले दहा आमदार विकास कामांमुळे ओळखल्या जातात, त्यात भोयर यांचा क्रमांक वरचा आहे. आपण कामांवार मते मागतो. त्यामुळे बूथ प्रमुखांनी अधिकाधिक मतदारांना मतदानसाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
congress leader pawan khera reply on bjp vote jihad
उलेमांचा पूर्वी भाजपलाही पाठिंबा ‘तो व्होट जिहाद नाही का’
लक्षवेधी लढत : यशोमती ठाकूर यांच्यासमोर भाजपचे आव्हान
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
Kothrud Assembly Constituency Assembly Election 2024 Division of Hindutva votes between BJP Shiv Sena Thackeray and MNS Pune news
‘सुरक्षित’ असूनही भाजपची कसोटी

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 Phase 1 : विदर्भात ५ जागांसाठी आज मतदान; नक्षलग्रस्त, संवेदनशील भागांत चोख सुरक्षा व्यवस्था

हेही वाचा – अभिमानाने म्हणा आपण हिंदू आहोत! सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन

आमदार भोयर म्हणाले की वर्धा विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार टॉपवर राहील. खासदार रामदास तडस यांनी बूथ पातळीवार काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य तो मान मिळेल. सर्व वक्त्यांनी आजच्या मोदींच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.