नागपूर: आम्ही मुस्लिम विरोधी नाही तर भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणा-यांच्या विरोधात आहोत. पाकिस्तान मॅच जिंकल्यानंतर भारतात राहून फटाके फोडणारे जे लोक आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही आहोत, असे बावनकुळे म्हणाले. ते नागपूर मध्ये पत्रकारांशी बोलत होते.राज्यात हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये भाऊ बंदकी आहे…या देशाचा रक्ताचा अंश आहे. की सर्वांना सोबत घेऊन आम्ही जातो, असे बावनकुळे म्हणाले
पंतप्रधान नागपूर दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३० मार्चला नागपूर दौरा आहे.. संघ मुख्यालय, दीक्षाभूमी, त्यानंतर माधव नेत्रालय आणि दारुगोळा निर्माण सोलार कंपनीला ते भेट देणार आहेत. भाजपकडून प्रत्येक चौकात मोदीजींचे स्वागत केले जाणार आहे..
नागपूरमध्ये उसळलेली दंगल आणि मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईमुळे भाजपच्या विरोधात अल्पसंख्यक समाजामध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. आम्हाला टार्गेट केले जात आहे, असा त्यांचा आरोप आहे. दंगलीला प्रोत्साहित करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत असाही रोष आहे. या सर्व घटनाक्रमावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मत व्यक्त केले.