नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या गृहजिल्ह्यात काँग्रेस नेते सुनील केदार यांनी धक्का दिला आहे.केदार यांनी जिल्हा परिषद भाजपकडून परत मिळावली होती. जिल्ह्यातील सात तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ही निवडणूक होण्यापूर्वीच केदार यांनी बावनकुळे यांना धक्का देत सावनेर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्व जागा केदार यांनी बिनविरोध जिकल्या आहेत.
नागपूर जिल्ह्यातील ७ तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत. जिल्ह्यातील सावनेर, रामटेक, कुही- मांढळ, उमरेड, भिवापूर, मौदा आणि पारशिवनी या सात कृषी बाजार समित्यांच्या निवडणूक होणार आहेत. केदार यांनी सावनेर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध केली आहे. सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८पैकी १८ जागा केदार गटाने बिनविरोध जिंकल्या आहेत. अशाप्रकारे सावनेर बाजार समितीवर केदार यांनी वर्चस्व कायम ठेवले आहे.