गोंदिया : गोरेगाव बाजार समितीवर भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सहकार पॅनलने एकहाती विजय मिळविला होता. त्यानंतर आज २९ मे रोजी झालेल्या सभापती व उपसभापती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे गिरधारी बघेले यांची सभापती तर भाजपाचे तेजेंद्र हरिणखेडे यांची उपसभापतिपदावर बिनविरोध निवड झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – हिंगणघाटकरांची प्रतीक्षा संपली; जयपूर-चेन्नई ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचली अन्..

या निवडणुकीत भाजपाप्रणीत किसान सहकार पॅनलने १८ पैकी १६ जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये किसान सहकार पॅनलचे ग्रामपंचायत गटातून तेजेंद्र हरिणखेडे, नुमानचंद चौधरी, नरेंद्र रहागंडाले, महिला गटातून शशी फुंडे, अडते व्यापारी व हमाल गटातून गोपाल ठाकूर, योगराज पटले, राजेश ताराम तर कैलास डोगंरे, गिरधारी बघेले, दसाराम साऊसकर (अविरोध), सेवा सहकारी गटातून किशोर गौतम, मोहन ठाकरे, योगराज पारधी, उकराम बिसेन, संजय भगत, संतोष रहागंडाले, अपक्ष महेंद्र ठाकूर तर सहकार परिवर्तन पॅनलच्या डिलेश्वरी तिरेले या महिला गटातून एकमेव विजयी झाल्या. आज सोमवारी झालेल्या सभापती, उपसभापती निवडणुकीनंतर भाजपाच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp wins in patel patole jurisdiction election of chairman deputy chairman on goregaon market committee sar 75 ssb