लोकसत्ता टीम

अकोला : विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील पाच मतदारसंघांपैकी अकोला पूर्वतील विक्रमी विजयासह तीन ठिकाणी कमळ फुलले आहे. अकोला पूर्व, अकोटमध्ये हॅट्ट्रिक, तर मूर्तिजापूरमध्ये भाजपने विजयी चौकर लगावला. तब्बल २९ वर्ष वर्चस्व राखलेला ‘अकोला पश्चिम’ हा भाजपचा बालेकिल्ला ढासळला आहे.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल

या ठिकाणी काँग्रेसने निसटता विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला. शिवसेना ठाकरे गटाने बाळापूरची जागा कायम राखली. जिल्ह्यात भाजपला तीन, तर काँग्रेस व शिवसेना उबाठा गटाला प्रत्येकी एका जागेवर यश मिळाले.

आणखी वाचा-‘टायगर अभी जिंदा है’! मुनगंटीवार म्हणाले होते, ‘मैं चुनाव हारा हूं, हिम्मत नही’

विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे रणधीर सावरकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे गोपाल दातकर यांचा दारुण पराभव केला. भाजपचे रणधीर सावरकर यांना एक लाख आठ हजार ६१९, शिवसेनेचे गोपाल दातकर ५८ हजार ००६ व वंचितचे ज्ञानेश्वर सुलताने यांना ५० हजार ६८१ मते मिळाली. ५० हजार ६१३ मताधिक्य मिळवत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. तब्बल २९ वर्षे अधिराज्य असलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात यावेळेस भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी भाजपचे विजय अग्रवाल यांचा अवघ्या एक हजार २८३ मतांनी पराभव केला. वंचित समर्थित अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांना २० हजार ५१७ मते मिळाली. या मतदारसंघात भाजपला बंडखोरीचा मोठा फटका बसला. भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा सलग सहा वेळा येथून निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर वर्षभरापासून ही जागा रिक्त होती. या मतदारसंघात भाजपला धक्का देत काँग्रेसने खाते उघडले आहे.

आणखी वाचा-रिसोडमध्ये काँग्रेसचे अमित झनक यांचा विजयी चौकार, वाशीम व कारंजामध्ये नव्यांना संधी

अकोट मतदारसंघामध्ये भाजपचे प्रकाश भारसाकळे यांनी काँग्रेसचे ॲड. महेश गणगणे यांचा १८ हजार ८५१ मतांनी पराभव केला. प्रकाश भारसाकळे यांना ९३ हजार ३३८, ॲड. महेश गणगणे यांना ७४ हजार ४८७ व वंचितचे दीपक बोडखे यांना ३४ हजार १३५ मते मिळाली. भारसाकळे यांनी अकोट मतदारसंघातून विजयाची हॅट्ट्रिक साधली.

मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे हरीश पिंपळे यांनी विजयाचा चौकार लगावला. हरीश पिंपळे यांना ९१ हजार ८२०, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे यांना ५५ हजार ९५६ व वंचितचे सुगत वाघमारेंना ४९ हजार ६०८ मते मिळाली. भाजपचे हरीश पिंपळे यांनी ३५ हजार ८६४ मतांनी विजय प्राप्त केला. बाळापूरची जागा शिवसेना उबाठा गटाने कायम राखली. नितीन देशमुख यांना ८२ हजार ८८, वंचितचे नातिकोद्दिन खतिब ७० हजार ३४९ व शिवसेना शिंदे गटाचे बळीराम सिरस्कारांना ६१ हजार ११२ मते मिळाली. ११ हजार ७३९ मतांनी शिवसेना ठाकरे गटाचा विजय झाला.

आणखी वाचा-काटोलमधील देशमुख पर्व संपुष्टात, सावनेरमध्ये उदय

अकोला पूर्वच्या इतिहासात प्रथमच हॅट्रिक

अकोला पूर्व मतदारसंघातून भाजपचे रणधीर सावरकर यांनी विजयाची हॅट्रिक साधली. मतदारसंघाच्या इतिहासात ही कामगिरी करणारे ते पहिलेच आमदार ठरले आहेत. ५० हजार ६१३ हे विक्रमी मताधिक्य देखील प्राप्त करून मंत्रिपदावर प्रबळ दावा केला आहे.

Story img Loader