चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची प्रमुख वर्तमान पत्रात भाजपने दिलेली जाहिरात बघता हा सोहळा महायुतीचा नाही तर भाजपचा आहे. भाजपने पूर्णपणे कार्यक्रम हायजॅक केल्याची चर्चा राजकीय वर्तुळासोबतच जनसामान्यांमध्ये सुरू झाली आहे.तसेच काही छायाचित्र भाजपने जाहिरातीत मुद्दाम वापरले नाही अशीही चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याचे २१ वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी मुंबईत पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जाहिरात राज्यातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे. भाजपने प्रसिद्ध केलेली ही जाहिरात सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

हेही वाचा…मुख्यमंत्रीपद नागपूरला आणि या आमदारांनाही मंत्रिपद संधी…आठपैकी तब्बल…

हा शपथविधी सोहळा महायुती सरकारचा असताना भाजपने हा शपथविधी सोहळा एकप्रकारे भाजप सरकारचा आहे असा संदेश जाहिरातींमधून दिला आहे असेही लोक चर्चेत बोलत आहे. महायुती सरकारचा हा शपथविधी असताना जाहिरात देखील महायुती सरकारचीच असायला हवी होती. मात्र या जाहिरातीत एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या फोटोना स्थान दिले आहे.

परंतु महायुतीचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे एकप्रकारे जाहिरात मधून देखील भाजपने मित्र पक्षावर दबाव टाकण्याचे काम केले आहे. या जाहिरातीत स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शाहू महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे नाही या बद्दल देखील अनेकांनी समाज माध्यमावर नाराजी व्यक्त केली आहे व करत आहेत. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा असा संदेश देण्याऐवजी भाजप नेते स्वतःची वाहवा या जाहिरातीतून करीत आहेत अशीही चर्चा आहे. त्यामुळे बाजूने दिलेली आजची जाहिरात राजकीय वर्तुळासोबतच जनसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. मते मागताना शाहू महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापर्यंत सर्वाची आठवण होते. मात्र अशाच वेळी या महापुरुषांचा विसर पडतो असेही आता बोलल्या जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps advertisement shows swearing in ceremony as bjps not mahayutis rsj 74 sud 02