वर्धा : भाजपचे सदस्यता नोंदणी अभियान जोरात सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात सदस्य नोंदणीचे टार्गेट पाऊन ते एक लाखाचे देण्यात आले आहे. हा आकडा पार करण्याची बाब जिल्हा पदाधिकाऱ्यांना अवघड ठरत असल्याचे चित्र उमटले होते. जिल्ह्यात दहा हजार पार देखील होत नसल्याचे चित्र राज्यभरात दिसून आले. परिणामी १ ते १५ जानेवारी ही मुदत आता वाढविण्यात आली आहे. ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता घर घर चलो अभियान सुरू करीत जिल्हा पदाधिकारी हातची कामे सोडून गावोगावी फिरत असल्याचे समाज माध्यमातील चित्र आहे. काहींनी तर विशेष शिबिरे आयोजित केली. सदस्य नोंदणीत एक अडथळा प्रामुख्याने त्रासदायी ठरत असल्याचे आढळून आले. सदस्य नोंदणीचे जे अॅप आहे ते हाताळणे सोपे नसल्याचे समजले. गावात प्रतिसाद आहे, पण नोंदणी होत नाही, अशा तक्रारी आल्यात. नोंदणी करणारा हा अॅपवर सदस्याची अपेक्षित माहिती नोंदवून घेऊ शकत नसल्याने आता जिल्हाध्यक्षनी गावनिहाय एक तंत्रज्ञ नेमला. त्याच्या मार्फत संभाव्य सदस्याची माहिती होऊ लागली आहे. या संभाव्य सदस्यांस ओटीपी मिळाला की तो घेऊन नोंदणी पूर्ण केल्या जाते. ही सुधारणा केल्याने आता आकडा सत्तर हजार पार गेल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा…काँग्रेसकडून ‘आरएसएस’वर बंदी घालण्याची मागणी का होत आहे ? सरसंघचालकांच्या अटकेसाठीही…

नोंदणी मंदगतीने होत असल्याचे निदर्शनास आल्यावर प्रदेश संघटनेने टार्गेट वाढविण्याचा निर्णय घेतला. आधीच घायकुतीस आलेल्या पदाधिकाऱ्यांचा जीव परत टांगणीस लागला. जिल्हा पदाधिकारी २५० ऐवजी आता ५०० सदस्यांची नोंदणी करतील. तर त्यापेक्षा खालील पदाधिकाऱ्यांना ५० ऐवजी १०० ची नोंदणी करावी लागणार. खासदार, आमदार यांना प्रत्येकी ५००चे टार्गेट होते. ते हजार करण्यात आले आहे. या पूर्वी झालेल्या सदस्य नोंदणी मोहिमेत १ लाख ३० हजार सदस्य नोंदणी झाली होती.

हेही वाचा…वडेट्टीवार महायुतीवर मसंतापले,”हा काय सावळा गोंधळ सुरू आहे?

आता हे एक आव्हान ठरल्याने विविध प्रकारे नोंदणी अभियान पुढे नेल्या जात आहे. मागे पडलेल्या आर्वी मतदारसंघात २१, २२ व २३ जानेवारीस घर चलो अभियान आयोजित आहे. तंत्रतज्ञ व्यक्तीस प्रत्येक गावात नेमण्यात आले आहे. असे ३०० तज्ञ नेमण्यात आल्याचे आमदार सुमित वानखेडे म्हणाले. विशेष मोहिमेत अपेक्षित सदस्य नोंदणी होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नोंदणी अँप हाताळण्याची सार्वत्रिक अडचण दिसून आल्याने त्यावर उपाय शोधून वेग वाढविण्याचे प्रयत्न आहेत. एक तेव्हडेच खरे ही मोहीम भाजप पदाधिकाऱ्यांची परीक्षाच घेणारी ठरत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps membership campaign is in full swing with one lakh registrations achieved in each district pmd 64 sud 02