नाव आणि पक्षचिन्ह दोन्ही गमावलेल्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केलेले आरोप बीनबुडाचे आहे. खैरे वैफल्यग्रस्त असून या आरोपांतून त्यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते, अशा शब्दात भाजपाने खैरेंवर पलटवार केला आहे. असे आरोप भाजपा कार्यकर्ता अजिबात खपवून घेणार नाही. खैरे हे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांना चंद्रपूर येथे भेटले, त्यावेळी यासंदर्भात विचारणा का केली नाही, असा सवालही भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा- नागपूर : भाजपाच्या कार्यक्रमातून माजी आमदार व माजी सभापतींची चप्पल चोरीला जाते तेव्हा…

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
What Vikrant Messy Said About Muslims
Vikrant Massey : “देशातल्या मुस्लिमांना धोका नाही, कुणीही..”, विक्रांत मेस्सीचं वक्तव्य; टीकेचा भडीमार
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपग्रहाद्वारे ईव्हीएम नियंत्रीत करतात, असा हास्यास्पद आरोप खैरे यांनी गडचिरोली येथे केला, तर चंद्रपूर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी हंसराज अहिर यांच्या पराभवाला वनमंत्री मुनगंटीवार जबाबदार आहेत, असा आरोप केला. हे दोन्ही आरोप त्यांनी मानसिक अस्वस्थतेतून केले असून कुठलेही पुरावे न देता असे निराधार आरोप करणे म्हणजे राजकीय शुचिर्भूततेचे अवमुल्यन आहे, अशी टीकादेखील भोंगळे यांनी केली आहे.

हेही वाचा- काय… इच्छा असूनही शिव्या देता येत नाही, मग स्पर्धा आहे ना!; आधी लिहा ओव्या आणि मग शिव्या

खैरे यांच्या पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यांच्या शिवसेनेचे अस्तित्व निवडणूक आयोगाने मान्य केले नाही त्यामुळे पक्षही गेला आणि चिन्हही गेले, यामुळे त्यांचे संतुलन बिघडले आहे. आजपर्यंत अहीर यांनीसुद्धा अशा पद्धतीचे आरोप कधीच आपल्या पक्षातील नेत्यांवर केले नाही. यामुळे खैरे यांनी चंद्रपुरात येऊन आग लावण्याचे व संभ्रम पसरवण्याचे काम करू नये. सत्ता गेल्यामुळे त्यांना वैफल्य आले आहे आणि त्यांच्या तथ्यहीन विधानातून ते स्पष्ट जाणवत आहे. अहीर यांची भेट झाली तेव्हाच खैरेंनी त्यांना याविषयी विचारायला हवे होते. खैरेंनी स्वत:चा पक्ष सांभाळावा, दुसऱ्याच्या घरात आग लावण्याचे काम करू नये, असा सल्लाही भोंगळेंनी त्यांना दिला आहे.