वर्धा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची काळी यादी आयोगाने जाहीर केली आहे.म्हणजे या यादीतील विद्यार्थ्यांना पुढील परीक्षा देण्याची संधी मिळणार नाही.२०११ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेपासूनची ही यादी असून त्यात ८३ उमेदवारांची नावे आहेत.जुलै २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेपर्यंतची ही यादी आहे. ८३ पैकी ७९ उमेदवारांना कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आले आहे.तर चौघांना पाच वर्षासाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सदर उमेदवारांना आयोगाकडून घेण्यात येणारी एकही परीक्षा या कालावधीत देता येणार नाही. पाच वर्षासाठी प्रतिबंधित करण्यात आलेल्या चार उमेदवारांना त्यांचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा परीक्षा देता येईल.परीक्षा कालावधीत गैरप्रकार केल्या प्रकरणी तसेच विविध कारणांसाठी उमेदवारांवर बंदी घातली जात असते.आयोगाने प्रसिद्ध केलेल्या काळ्या यादीत सर्वाधिक उमेदवार हे २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या कर सहाय्यक परीक्षेतील आहेत.विविध परीक्षेतील उमेदवारांचा या यादीत समावेश आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black list of students who misbehaved in mpsc exam announced pmd 64 amy
Show comments