लोकसत्ता टीम

नागपूर : तब्बल सहा वर्षांनंतर विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा मैदानावर भारतविरुद्ध इंग्लंड एकदिवसीय क्रिकेट सामना रंगणार आहे. सामना बघण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. मात्र, क्रिकेट सामन्यांची तिकीटविक्री अवघ्या काही मिनिटांतच संपल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. याचाच गैरफायदा काहींनी घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिकिटांचा काळाबाजार सुरु केला. सदर पोलीस आणि गुन्हे शाखेने दोन ठिकाणी छापा घालून तिघांना तिकिटांची चढ्या दरात विक्री करताना अटक केली. मनोहर हेमनदास वंजानी (६२, डागा इस्पितळाजवळ, गांधीबाग), राहुल भाऊदास वानखेडे (३८, स्मृती ले आऊट, दत्तवाडी) आणि राहुल दशरथ मोहाडिकर (३४, देशपांडे लेआऊट, त्रिमूर्तीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

England vs India match Cricket bookies active for betting Nagpur news
इंग्लंड विरुद्ध भारत : सट्टेबाजीसाठी क्रिकेट बुकी सक्रिय; दोन हजार कोटींपेक्षा जास्त…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IND vs ENG ODI Series Full Schedule Timings and Squads in Detail India England
IND vs ENG: भारत वि इंग्लंड वनडे मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक वाचा एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Varun Chakaravarthy trains with ODI squad in Nagpur ahead of India vs England series
IND vs ENG: भारताचा मिस्ट्री स्पिनर अचानक इंग्लंडविरूद्ध वनडे संघात दाखल, BCCIने केलं जाहीर; कसा आहे संपूर्ण संघ?
nagpur on Sunday india Vs england series first match Online ticket sales began and sold out within minutes
नागपूर : भारत वि. इंग्लंड सामना, काही मिनिटातच संपली तिकिटे…
IND vs ENG Saqib Mahmood Triple Maiden Wicket Over
IND vs ENG: कानामागून आला, भारी पडला! व्हिसा दिरंगाई बाजूला सारत मेहमूदने भारताची उडवली दाणादाण, ३ चेंडूत ३ विकेट
England Beat India by 26 Runs Varun Chakravarthy Fifer Ben Duckett fifty IND vs ENG
IND vs ENG: टीम इंडियाची हुकली विजयाची हॅट्ट्रिक! इंग्लंडचं टी-२० मालिकेत दणक्यात पुनरागमन; वरूण चक्रवर्तीच्या कामगिरीवर फेरलं पाणी
IND vs ENG Suryakumar Yadav shed light on the situation, revealing that the exclusion of Mohammed Shami was purely a tactical decision
IND vs ENG : मोहम्मद शमी फिट की अनफिट? पहिल्या सामन्यातून वगळण्याबाबत सूर्यकुमार यादवने केला खुलासा

गुरुवारी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार सुरू असताना पोलिसांनी सदर येथील व्हीसीए मैदानाजवळूनच दोघांना ताब्यात घेतले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दोघेही विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे कर्मचारी असल्याची बतावणी करून काळाबाजार करत होते. आरोपींमध्ये ज्येष्ठ नागरिकाचादेखील समावेश आहे. सदर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. मनोहर हेमनदास वंजानी (६२, डागा हॉस्पिटलजवळ, गांधीबाग) व राहुल भाऊदास वानखेडे (३८, स्मृती ले आऊट, दत्तवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनाही व्हीसीएजवळून रंगेहाथ पकडण्यात आले. ऑनलाईन तिकीट खरेदी केलेल्यांना बारकोड दाखवून सिव्हिल लाईन्स व्हीसीएतून तिकिटाची ‘हार्डकॉपी’ घ्यायची होती. त्यासाठी सोमवारपासूनच क्रिकेटप्रेमींच्या रांगा होत्या. यासाठी पोलिसांचा बंदोबस्तदेखील तैनात होता.

खबऱ्यांच्या माध्यमातून वंजानी व वानखेडे हे हेरिटेज हॉटेलजवळील गल्लीत जास्त दराने तिकीट विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन चाचपणी केली असता तेथे दोघेही चढ्या दराने तिकीट विकताना दिसून आले. ते लोकांना व्हीसीएचे कर्मचारी असल्याची बतावणी करत होते. वंजानीकडून पोलिसांनी साऊथ स्टॅंडची दोन तिकिटे तर वानखेडेकडून ईस्ट स्टँडची चार तिकिटे जप्त केली. वंजानी तीन हजारांचे तिकीट सहा हजारांना विकत होता तर वानखेडे ८०० रुपयांचे तिकीट दोन हजारांना देत होता. या दोघांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली. त्यांच्याकडे तिकिटे कुठून आली? याची चौकशी सुरू आहे.

पागलखाना चौकातून एकाला अटक

क्रिकेट सामन्याची चढ्या दराने तिकीट विक्री करणाऱ्या राहुल मोहाडिकर या युुवकाला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली. त्याच्याकडे आठशे रुपये दराच्या सहा तिकिटा आढळून आल्या. आठशे रुपयांची तिकीट तो दोन हजार रुपयांनी विक्री करीत होता. विशेष म्हणजे त्याने आतापर्यंत जवळपास २० तिकिटा विकल्याची माहिती आहे.

Story img Loader