अमरावती : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका ट्रॅव्हल्स एजंटकडून संगणकासह विविध नावांच्या आयडी, ई-तिकीट व अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आले असून रेल्वे सुरक्षा बलाने ही कारवाई केली. संजय हरिओम अग्रवाल (५४, रा. कॉंग्रेसनगर रोड, सुंदरलाल चौक, अमरावती) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे.
पुणे येथील सायबर सेलने रेल्वे तिकिटांच्या आयडी पडताळणीचे निर्देश दिले होते. त्यानुसार आरपीएफच्या पथकाने अग्रवाल ट्रॅव्हल ॲण्ड स्टेशनरी या प्रतिष्ठानची तपासणी केली. अग्रवाल यांनी अधिकृत रेल्वे तिकीट एजंट असल्याचे सांगितले. त्यानंतर आरपीएफ पथकाने चौकशीदरम्यान १३ वैयक्तिक वापरकर्ता आयडी व्यतिरिक्त त्यांच्याकडे ८ आयडी आढळून आले. भुसावळ आरपीएफने आरोपीविरुद्ध रेल्वे कायदा कलम १४३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
हेही वाचा – वर्धा : जमनालाल बजाज संस्थेची दुर्बल शाळांना दहा कोटींची मदत
हेही वाचा – वाशिम : वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना; सिग्नल यंत्रणाही कुचकामी!
दुकानातून २२५०० रुपये किमतीचा मोबाईल व २० हजार रुपये किंमतीचा संगणक जप्त करून तपासासाठी ताब्यात घेण्यात आला. त्यात एकूण २७ ट्रॅव्हल-एंड रेल्वे ई-तिकिटे ३९९५९ रुपये आणि एकूण २१ वैयक्तिक यूजर आयडी मिळून ४३ ई-तिकिटे मिळाली. याची किंमत ७६८२४ रुपये होती. या सर्व तिकिटांचे प्रति व्यक्ती ५० रुपये अतिरिक्त तिकीट भाडे लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले.