लोकसत्ता टीम
गोंदिया : जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. यादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी सीमावर्ती भागात कडक पोलिस बदोबस्त लावला आहे. सीमावर्ती भागात तपासणी नाके तयार करण्यात आले आहे. या नाक्यावर दुचाकींसह, तिनचाकीह, चारचाकी वाहने व इतर वाहनांची तपासणी केली जात आहे.
आमगावपासून मध्यप्रदेशाची सीमा केवळ पाच किमी अंतरावर आहे. या भागातील नागरिकांची मध्यप्रदेशातील लांजी परिसरात ये- जा सुरू असते. तसेच गोंदिया आणि आमगाव येथून लांजीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स सुद्धा जातात.निवडणुकीदरम्यान रोकड नेली जात असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बाघ नदीजवळ मध्यप्रदेशच्या सीमेजवळ तपासणी नाका तयार करण्यात आला आहे. तर महाराष्ट्र पोलिसांनी सुद्धा याठिकाणी चौकी तयार केली आहे.
आणखी वाचा-‘ती’ मुलगी नैसर्गिक केसांना कायमची मुकणार…
दोन्हीकडून येणाऱ्या दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांची या नाक्यावर तपासणी करून पुढे पाठविले जात आहे. तसेच याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. याठिकाणी पोलिसांसह महसूल व वनविभागाचे कर्मचारी कर्तव्य त्या बजावत आहेत.
निवडणुकी दरम्यान रोख रक्कम आणि दारूची वाहतूक होत असते. या प्रकाराला पायबंद लावण्यासाठीच ही उपाययोजना केली जात आहे. या तपासणी नाक्यावर तीन पाळीत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान देखील दक्ष झाले आहे. रेल्वे गाड्यांमध्ये साध्या वेशातील पोलिस कर्मचारी संशयितांच्या हालचालीवर नजर ठेवून आहे.
आणखी वाचा-पत्नीने विचारले, दारु का पित बसता? पतीने रागाच्या भरात…
एखादा संशयित व्यक्ती आढळल्यास त्याची पोलिस कर्मचारी कसून चौकशी करीत आहेत. मध्यप्रदेशात १७ नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्याचया सीमावर्ती भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.