अकोला : जिल्ह्यातील माना ते मूर्तिजापूर दरम्यान मध्य रेल्वे मार्गाच्या रुळाखालील भराव मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून दोन्ही बाजूची वाहतूक रोखण्यात आली आहे. रेल्वे मार्ग सुरळीत करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे प्रवासी गाड्यांचा खोळंबा झाला असून काही गाड्या रद्द, तर काहींचा मार्ग बदलण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे मध्य रेल्वेच्या माना ते मूर्तिजापूर रेल्वे मार्गावरील हिरपूर गेटजवळील पोल क्रमांक ३५३४ जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या ठिकाणा भुयारी मार्गाचे काम देखील सुरू आहे. साचलेले पाणी रुळाखालून वाहून जात आहे. त्या पाण्यासोबत गिट्टी देखील वाहून गेल्याने रुळाचा काही भाग हा अधांतरी झाला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मध्य रेल्वेची अप आणि डाऊन वाहतूक रोखून धरण्यात आली. मूर्तिजापूर, बडनेरासह इतर रेल्वेस्थानकावर गाड्या थांबवण्यात आल्या. हे दुरुस्तीचे कार्य रात्री ८.३० वाजतापासून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यंत हे कार्य सुरू होते. संपूर्ण दुरुस्तीच्या कार्याला सात ते आठ तास लागण्याची शक्यता आहे.

in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित

या घटनेमुळे मध्य रेल्वेचे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. १११२१ भुसावळ-वर्धा मेमू, १२८३३ अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस, २२८२७ पुरी-सुरत सुपरफास्ट एक्सप्रेस, १२१०६ विदर्भ एक्सप्रेस, १२१३६ नागपूर-पूणे एक्सप्रेस, १२१०२ ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, २२९४० हापा एक्सप्रेस आदी गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. दरम्यान, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामध्ये अप मार्गावरील २२८२७ पुरी-सुरत सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी बडनेरावरून नरखेड, इटारसी, खंडवा, भुसावळ मार्गे सुरत येथे दाखल होणार आहे. २२९४० बिलासपूर-हापा एक्सप्रेस अंजनी स्थानकावरून नागपूर, इटारसी, खंडवा, भसावळ मार्गे धावणार आहे. डाऊन मार्गावरील सुरत-मालदा टाऊन एक्सप्रेस भुसावळ, खंडवा, इटारसी मार्गे नागपूर येथे दाखल होईल. २२७३८ हिसरा-सिकंदराबाद एक्सप्रेस अकोल्यावरून पूर्णा, नांदेड मार्गे सिंकदराबाद येथे पोहचणार आहे. १२१३९ सेवाग्राम एक्सप्रेस मुंबई वरून भुसावळपर्यंतच धावेल. ०११४० मडगाव-नागपूर विशेष एक्सप्रेस अकोल्यापर्यंतच येऊन थांबली आहे. १२२२१ पुणे-हावडा एक्सप्रेस भुसावळ, इटारसी नागपूर मार्गे धावणार आहे. १२१४० सेवाग्राम एक्सप्रेस भुसावळपासून मुंबईला जाईल. १२११२ अमरावती-मुंबई अंबा एक्सप्रेस बडनेरा येथून अमरावतीला परत पाठविण्यात आली आहे. त्या गाडीची फेरी रद्द करण्यात आली. १११२१ भुसावळ-वर्धा मेमू मूर्तिजापूरपर्यंतच धावली, अशी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देण्यात आली.