भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी २१ मे रोजी राजीव गांधी स्पोर्ट्स फाऊंडेशन नागपूरच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात ४९ युवकांनी रक्तदान केले.
दरवर्षी राजीव गांधी यांचा स्मृतिदिन शहीद दिन म्हणून पाळला जातो. या निमित्त राजीव गांधी स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे मागील २५ वर्षांपासून रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविला जातो. यंदाही फाऊंडेशनने नेहरू युवा केंद्र, माऊंन्ट कार्मेल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धामार्गावरील राजीव गांधी चौकात सकाळी ९ वाजता शिबीर घेण्यात आले. उद्घाटन काँग्रेस नेते अनंतराव घारड यांच्या हस्ते झाले. शासनाचे कोणतेही अनुदान किंवा मदत न घेता २५ वर्षांपासून एखादा उपक्रम राबविणे अवघड काम आहे, मात्र राजीव गांधी स्पोर्ट्स फाऊं डेशनने ते राबविले ही बाब कौतुकास्पद आहे, असे घारड म्हणाले. नेहरू युवा केंद्र या उपक्रमासोबत अनेक वर्षांपासून जुळले आहे, देशसेवा हेच यामागचे उद्दिष्ट आहे, असे केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शरद साळुके म्हणाले. राजीव गांधी यांनी देशात संगणक क्रांती घडवून आणली, असे माऊंट कार्मेलच्या सिस्टर सबीना म्हणाल्या. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते संजय दुधे यांनी यावेळी राजीव गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे संजय राऊत, कृष्णा चौधरी, प्रज्ञा बडवाईक, राजकुमार रामटेके, गौरव दलाल उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा