लोकसत्ता टीम
गोंदिया : शहरात वाळू व्यवसायाशी संबंधित गोलू तिवारी याची सोमवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. शहरात व्यावसायिक गुन्हेगारांचे अड्डे झपाट्याने वाढत चालले असून, येथे व्यवसायाच्या निमित्तानं संघटित पद्धतीने रक्तपात केला जात आहे. गेल्या काही वर्षात अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली असून, यामध्ये व्यावसायिकांनी एकमेकांना स्पर्धेत पराभूत करण्यासाठी वेगवेगळे डावपेच अवलंबले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोलू तिवारीवर वनविभाग कार्यालयासमोर कुडवा नाका टी.बी. टोली परिसरात गोळीबार करण्यात आला . गोलू तिवारी याला सहयोग रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोलू तिवारी रिंग रोडवरील हनुमान नगर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे संपूर्ण तिवारी कुटुंबात शोककळा पसरली आहे. गोलू तिवारीशी संबंधित मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोलू तिवारी कुणाच्याही मदतीसाठी नेहमीच पुढे असायचा.
आणखी वाचा-पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली! बहिणीच्या संसारालाच सुरुंग…
या घटनेची माहिती मिळताच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, फॉरेन्सिक टीम, श्वानपथक, सीसीटीव्ही यासह सर्व प्रकारचे पुरावे गोळा करून मारेकऱ्यांना पकडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले.