सावली तालुक्यातील गायडोंगरी येथील दोन भावांमध्ये सुरू असलेल्या जमिनीच्या वादाचा रक्तरंजित शेवट झाला. जमिनीवरून उद्भवलेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीचा खून केला. मनोहर निंबाजी गुरुनुले (६२), शारदा मनोहर गुरुनुले (५०), अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. याप्रकरणी धनराज निंबाजी गुरुनुले (५२) याला पोलिसांनी अटक केली आहे.
मनोहर व धनराज गुरूनुले या दोन भांवडांमध्ये जमिनीवरून वाद झाला. त्यातच धनराजने मनोहर आणि वहिणी शारदा यांना सब्बलने मारहाण केली. त्यात मनोहरचा जागीच मृत्यू झाला, तर शारदाचा गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहड आपल्या ताफ्यासह तेथे पोहोचले. पोलिसांनी आरोपी धनराज गुरुनुले याला अटक केली आहे.