चंद्रपूर जिल्ह्यात व्याघ्रदर्शनासाठी देशविदेशातून पर्यटक येतात. वाघ व बिबट्या इथले वन्यजीव जिल्ह्याचे वैभव ठरले असले तरी मानव-वन्यजीव संघर्षही इथं टोकाला गेलेला आहे. मात्र, वरोरा तालुक्यात घडलेल्या एका घटनेने मानव-वन्यजीव प्रेमाचा नवा अध्याय लिहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरात शिरलेली नीलगाय बिनधास्त एखाद्या पाहुण्यासारखी बसली होती. दुसरीकडे घरातील सदस्यांनी न घाबरता तिला तितक्याच प्रेमाने घरात आसरा दिला.

वरोरा तालुक्यातील मजरा गावात आज नीलगाय आली. ती दोन घरांमध्ये शिरली. घरातील वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ही नीलगाय घरात पाहुण्यासारखी बसली होती. घरातील सदस्यांनी तिला तितक्याच प्रेमाने वागवले. मानव-वन्यजीव प्रेमसंबंधाचा नवा अध्याय यावेळी दिसला.

दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. जखमी नीलगायीला ग्रामस्थांच्या मदतीने पकडून उपचाराकरिता वरोरा शहरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारानंतर तिला मुक्त अधिवासात सोडण्यात आले.