मंडळाच्या नागपुरातील कर्मचाऱ्यांचा हालचालींना विरोध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विविध शासकीय संस्था, संघटना, कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना एका निश्चित कालावधीत प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय नागपुरातून दिल्लीला नेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. देशाच्या मध्यभागी असलेल्या या शहराचे महत्व लक्षात घेऊन तत्कालीन केंद्र सरकारने अनेक राष्ट्रीय संस्था व संघटनांचे मुख्यालय येथे स्थापन केले. मात्र, केंद्रात भाजप सरकार आल्यावर शहरातील विविध राष्ट्रीय संस्थांची मुख्यालये दिल्ली किंवा अन्यत्र हलवण्याचा घाट रचण्यात आला आहे.

मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी या हालचालींना विरोध सुरू केला आहे. येथील कर्मचारी ८ ऑगस्टपासून काळ्या फिती लावून काम करीत आहेत, असे सेंट्रल गव्‍‌र्हमेन्ट एम्प्लाईज कॉन्फडरेशनचे सरचिटणीस एन.एस. पिल्लई यांनी सांगितले.

केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सूत्रे घेतल्यानंतर काही दिवसात केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांच्या विश्वासातील के. लक्ष्मा रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून नागपुरातील मुख्यालय दिल्लीत हलवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. अध्यक्षांनी दरदिवशी मुख्यालयात येणे अपेक्षित असूनही रेड्डी मुख्यालयात फिरकले नाहीत. त्यांना दिल्लीत बसून मंडळाचा कारभार हाकायचा असल्याने मुख्यालय हलवण्याची त्यांना घाई झालेली आहे. रेड्डी यांनी तसा प्रस्ताव कामागार मंत्र्यांकडे सादर करून त्यासाठी खर्चाची तरतूदही केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. दिल्लीत मुख्यालय असल्यास खाते प्रकाशझोतात राहते व फाइल्स मंजूर होण्याची गती वाढते. नागपुरात भारतीय प्रशासकीय अधिकारी येण्यास तयार होत नाहीत. मुख्यालयातील संचालक, अतिरिक्त संचालक तसेच इतर अनेक पदे रिक्त आहेत. राजधानीत मुख्यालय असल्यामुळे कामाची गती वाढते, अशी अनेक कारणे मुख्यालय स्थानांतरित करण्यासाठी देण्यात येत आहेत. येथील दहा-बारा कर्मचाऱ्यांनाही दिल्लीत हलविले जाईल, पण त्यासाठी कर्मचाऱ्यांना दिल्लीस जाण्याचा किंवा नागपुरात राहण्याचा पर्याय दिला जाणार आहे.

चांगले प्रशिक्षित कर्मचारी निर्माण व्हावे म्हणून १९५८ मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली. त्याचे मुख्यालय तेव्हापासून नागपुरातच असून, प्रत्येक राज्यात कार्यालय आहे. त्या सर्व कार्यालयांच्या कामकाजावर नियंत्रण नागपुरातून होते. प्रादेशिक कार्यालयाद्वारे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. औद्योगिक व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचा सहभाग उद्योगात चांगला रहावा, प्रशिक्षित संघटनेचे प्रतिनिधी निर्माण व्हावे, याचे शिक्षण देणारे प्राध्यापक व कर्मचारी या मुख्यालयाकडे आहेत. आता नागपूरचे हे मुख्यालयच दिल्लीला हलविण्यात येणार असल्याने नागपुरातून राष्ट्रीय पातळीवरील एक मुख्यालय कमी होणार आहे.

मुख्यालय हलविण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध असल्याचे मंडळाचे अध्यक्ष आणि मंत्रालयाला कळवण्यात आले. दिल्लीत उभारण्यात आलेली इमारत मंडळाच्या मुख्यालयासाठी नाही, असे पत्र कामगार मंत्रालयाकडून प्राप्त झाले आहे, याची कर्मचाऱ्यांना कल्पना आहे. मुख्यालय दिल्लीत स्थानांतरित केले जाणार नाही, असे लेखी आश्वासन देण्याची मागणी कर्मचारी करीत आहे. हा निर्णय संचालक पातळीवरचा नाही. माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. असे लिहून देणे अशक्य आहे.

जे.पी. फोगट, संचालक (प्रभारी),केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळ.