बुलढाणा जिल्ह्यातील पेपर फूट प्रकरणाची अमरावती विभागीय मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.
हेही वाचा- बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यात नक्कल करणारे दोन विद्यार्थी निलंबित
सिंदखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याचे आज निदर्शनास आले. यामुळे शिक्षण विभाग हादरला आहे. तक्रार देण्याच्या प्रक्रियेत व्यस्त असताना उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जगन मुंडे यांना आज दुपारी माध्यमांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गाठले. यावेळी मुंडे यांनी सांगितले की, बोर्डाने याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार आम्ही सिंदखेडराजा येथे तक्रार देण्यासाठी जात आहोत. याप्रकरणी तपासात जे कुणी दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सिंदखेडराजाकडे रवाना होण्यापूर्वी सांगितले.