नागपूर : वाकी परिसरातील कन्हान नदीत बुडालेल्या चौघांपैकी दोघांचे मृतदेह शोधण्यात शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलिसांना यश आले. इतर दोघांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे. शुक्रवारी रात्री अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. शनिवारी (आज) सकाळी पुन्हा शोधकार्याला सुरवात झाली आहे.
सोनिया मरसकोल्हे (१७) नारा आणि विजय ठाकरे (१९) नारा या दोघांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासून शोध सुरू केला होता. त्यासाठी विविध यंत्रणांचीही मदत घेतली गेली. शेवटी रात्री दोन मृतदेह शोधण्यात चमूला यश आले.
हेही वाचा – तलाठ्यांनो, नव्या भरतीपर्यंत उपस्थितीचे वेळापत्रक लावा, शासनाचा आदेश
हेही वाचा – Talathi Bharti: पेपरफुटीविरोधात विद्यार्थी संतप्त!
नारा आणि कामठी येथील सहा मित्र-मैत्रिणी १७ ऑगस्टला सकाळी ११ वाजता कामठीतून वाकी दर्शनासाठी गेले. दर्शनानंतर कन्हान नदीवर आंघोळीचा मोह झाल्यावर चौघे नदीत उतरले. त्यापैकी दोघी काठावर आंघोळ करीत होत्या. यादरम्यान नदीत उतरलेली सोनिया बुडायला लागली. तिला वाचवण्यासाठी विजय ठाकरे, अंकुल आणि अर्पितनेही पाण्यात उडी घेतली. शेवटी चौघेही नदीत बुडाले होते.