चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा मृतदेहच आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या मागे घातपाताचा संशय वर्तविला जात आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आला असता संतप्त गावक-यांनीही येथे गर्दी केली. याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा : नागपूर : दारू चोरून प्यायल्याच्या संशयावरून मजुराला पेटवण्याचा प्रयत्न ; नरखेड तालुक्यातील घटना

अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तळेगाव टाळातुले येथील ही घटना. ३१ ऑगस्टला मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आईवडिलांनी केली होती. दोन दिवस उलटूनही मुलगी सापडत नाही म्हणून कुटुंबाने पोलीस ठाण्यात ठिय्याही दिला. मात्र, कसलीच हालचाल झाली नाही, असा आरोप कुटुंबाने आज केला. काल रात्री मुलीचा मृतदेह शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आला. मृतदेहावर अॅसिड टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे मुलीच्या आप्तस्वकियांनी रुग्णालयात गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच खा. रामदास तडसही तेथे दाखल झाले.

Story img Loader