अमरावती : बडनेरा रेल्‍वे स्‍थानकाच्‍या मागील वाहनतळानजीक पाण्‍याच्‍या टाकीजवळ मंगळवारी सकाळी एका २२ वर्षीय युवतीचा मृतदेह निर्वस्त्र स्थितीत सापडल्‍याने एकच खळबळ उडाली. मृतदेहाशेजारी रक्‍ताचे डाग आणि युवतीच्‍या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा आढळून आल्‍या आहेत. युवतीची हत्‍या करण्‍यात आल्‍याचा संशय व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

बडनेरा रेल्‍वे स्‍थानकाच्‍या मागील बाजूने असलेल्‍या वाहनतळाजवळ पाण्‍याच्‍या टाकीखाली खोली बांधण्‍यात आली आहे. या खोलीला लागूनच जमिनीवर अज्ञात युवतीचा मृतदेह आढळून आला. परिसरातील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), सरकारी रेल्‍वे पोलीस (जीआरपी) आणि बडनेरा पोलिसांचे पथक घटनास्‍थळी पोहचले. मृतदेहाशेजारी त्‍यांना रक्‍ताचे डाग आढळून आले आणि युवतीच्‍या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा असल्‍याचे दिसून आले. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. या युवतीची हत्‍या करण्‍यात आल्‍याचा संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केला असून तीनही यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे. या युवतीचे वय अंदाजे २२ वर्षे आहे. तिची ओळख पटविण्‍याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. शवविच्‍छेदनातून इतर बाबींचा उलगडा होऊ शकेल. रेल्‍वे स्‍थानक परिसरात रात्रभर वर्दळ असताना ही घटना घडल्‍याने आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जात आहे.

Two tigress cubs die in Pench Tiger Reserve
वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू, एकाचा जीवनमरणाचा संघर्ष…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
psychiatrist sexually abused nearly hundred women in Hudakeshwar area
नागपूर : खळबळजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषण…
Kerala Crime
Kerala Horror : धक्कादायक! दलित तरुणीवर ५ वर्षांत ६२ जणांकडून बलात्कार; पोलि‍सांनी आतापर्यंत ४४ जणांच्या आवळल्या मुसक्या
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल
gang-rape_
Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!

हे ही वाचा…नागपूर: उड्डाण पुलांचा घोळात घोळ, सोयींऐवजी वाहतूक कोंडीची भर

महिलेने चोरले २५ लाखांचे दागिने

शहरातील अंबापेठमध्ये राहणाऱ्या एका शासकीय कंत्राटदाराच्या घरी कंत्राटदाराच्या आईची सुश्रुषा करण्यासाठी एक महिला येत होती. या महिलेने कंत्राटदाराच्या घरातील कपाटातून तब्बल ३३० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत २३ लाख १० हजार) व दोन किलो चांदी (किंमत १ लाख ८० हजार रुपये) असा एकूण २५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी संशयित महिलेविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिला अटक केली. तिच्‍याकडून ३० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. रतनदिपसिंग सतवंतसिंग बग्गा (४४, रा. अंबापेठ, अमरावती) असे तक्रारदाराचे नाव आहे.

हे ही वाचा…कोजागिरी! पोर्णिमेच्या रात्री सूपरमून दर्शन, असा आहे दुग्धशर्करा योग.

दसऱ्यानिमित्त पूजेसाठी दागिने लागणार होते, म्हणून बग्गा हे त्यांच्या आईच्या खोलीतील कपाटातून दागिने काढण्यासाठी गेले, त्यावेळी त्यांना कपाटात दागिने नव्हते. त्यांनी घरात इतरत्र दागिन्यांचा शोध घेतला, मात्र दागिने कुठेही दिसले नाही. त्यामुळे केअरटेकर महिलेने दागिने चोरले असावे, असा संशय त्यांना आला होता.

Story img Loader