लोकसत्ता टीम

बुलढाणा: बुलढाणा पोलीस विभाग, राजकीय वर्तुळासह जिल्ह्यात किंबहुना राज्यात खळबळ उडविणारी घटना बुलढाणा शहरात नुकतेच घडली आहे. यामुळे बुलढाणा शहर आणि पोलीस दल अक्षरशः हादरले आहे

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Pansare murder case, ATS claim, high court,
पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
Kothrud Assembly Constituency Assembly Election 2024 Division of Hindutva votes between BJP Shiv Sena Thackeray and MNS Pune news
‘सुरक्षित’ असूनही भाजपची कसोटी

चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील ( भारतीय जनता पार्टी) यांचे अंगरक्षक अजय गिरी यांनी सुमारे अर्धा तासापूर्वी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना उपचारासाठी स्थानिय जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालय मधील वरिष्ठ सूत्रांनी याची पुष्टी केली आहे. थोड्या वेळापूर्वीच बुलडाणा शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा-अमरावती : ‘विदेशी नोटा भारतीय चलनात बदलून देता का?’ आंतरराज्‍यीय टोळीतील तीन महिला…

अजय गिरी असे या पोलीस कर्मचारी आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या अंग रक्षकाचे ( बॉडी गार्ड चे) नाव आहे. ते मागील तीन वर्षांपासून आमदार श्वेता महाले यांचे अंग रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना बुलढाणा पोलीस विभागाकडून ९ एम एम पिस्तुल ( ब्राऊनी?) देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.

आज बुधवारी, ३१ जुलै रोजी अजय गिरी हे कर्तव्यावर नव्हते. आमदार श्वेता ताई महादेव पाटील यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने पिस्तुल देण्यात आले आहे.गिरी हे बुलढाणा शहरात पोलीस वसाहतीत राहत होते. तिथेच राहत्या शासकीय निवासस्थानी पिस्तुलनेच त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. याची माहिती मिळताच त्यांना (गिरी) यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालय आणि घटनास्थळी सहकाऱ्यासह भेट दिली.

आणखी वाचा-नागपुरात एसटी कामगारांनी वाजवला ढोल… बधिर शासनाला जागे करण्यासाठी घंटीही…

कौटुंबिक कारणातून आत्महत्या!

गिरी यांनी कौटुंबिक कारणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज बुलढाणा पोलिसांनी वर्तवला आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी आज माध्यमांसोबत बोलताना ही माहिती दिली. चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनीही या प्राथमिक अंदाजाला पुष्टी दिली आहे. या घटनेमुळे आपणास धक्का बसला. पोलिसांनी कौटुंबिक कारणामुळे गिरी यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. झालेली घटना दुःखद आणि धक्कादायक असली तरी या घटनेच्या विशेष चौकशीची गरज नसल्याचे आमदार महाले म्हणाल्या. त्यांच्या मनात काही वेगळे असते तर ते माझ्याशी बोलले असते. किमान त्यांनी ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली असती, असेही आमदारांनी सांगितले.

‘यामुळे’ वाढले घटनेचे गांभीर्य

कोणाचीही आत्महत्या ही दुःखदच असते. त्यातही लोकांच्या रक्षणासाठी विशेष म्हणजे एका आमदाराच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसाने केलेली आत्महत्या गंभीर बाब ठरते. गिरी यांची आत्महत्या गृह विभागासह राज्यात खळबळ उडविणारी ठरली आहे. आमदार महाले या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू समजल्या जातात. याला एक दुसरा कोनही आहे. आमदार महाले यांचे पती विद्याधर महाले हे वरिष्ठ मंत्रालयीन अधिकारी आहेत. ते गृहमंत्री फडणवीस याचे खासगी सचिव म्हणून कार्यरत आहेत. गृहमंत्र्यांच्या खाजगी सचिवांच्या अर्धांगिनी असलेल्या आमदार श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डने गोळी झाडून घेतल्याने ही घटना राज्यात जास्तच खळबळ उडविणारी ठरली. कदाचित त्याचे पडसाद आणखी काही दिवस उमटत राहणार, असा रागरंग आहे.