चंद्रपूर: जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सिने अभिनेत्री रवीना टंडन हिने पंधरा दिवसात दुसऱ्यांदा भेट दिली आहे. मागील महिन्यातील १८ जून रोजी आणि मंगळवार ४ जुलै ला सिनेअभिनेत्री रविना टंडन या ताडोबात आल्या. यावेळी त्यांच्यासोबत काही मैत्रिणी होत्या.
ताडोबातील जंगल सफारीने आणि तेथील वाघांनी सिनेअभिनेत्री रविना टंडन यांना भुरळ घातली आहे. त्यामुळे रविना टंडन या केवळ पंधरा दिवसांमध्येच दुसऱ्यांदा आपल्या मुलीसह ताडोबा येथे आल्या आहेत. मंगळवारी ४ जुलै रोजी सकाळच्या वेळेस त्यांनी अलीझजा गेट वरून जंगल सफारी देखील केली.
अलीझंजा सफारी दरम्यान भानुसखिंडी येथे बबली वाघीण व पिल्ले तसेच मदनापूर मध्ये झुनाबाई तिचे दोन पिल्ले आणि अन्य ठिकाणी वाघाचे दर्शन असे एकूण तब्बल अकरा वाघांचे दर्शन सिनेअभिनेत्री रविना टंडनला झाले आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. दुपारी मदनापूर गेटवरून सफारी झाल्या नंतर रविना टंडन यांनी स्वसारा रिसॉर्ट कोलारा येथे विश्रांती घेतली.
हेही वाचा… असे घरमालक, असेही भाडेकरू ! शासकीय कार्यालयाचे तब्बल ९९ महिन्याचे भाडे थकीत
विश्रांतीनंतर तिथून ती रामदेगी गेट ला जाईल अशी माहिती मिळाली होती. परंतु सायंकाळी ६ वाजत पर्यंत आलेली नसून मदनापूर गेट वरूनच सफारी केली असल्याची माहिती मिळाली असून त्यानंतर लिंबन् रिसॉर्ट ला सिनेअभिनेत्री रविना टंडन यांच्या मुलीसह मुक्काम् आहे अशी माहिती मिळाली आहे. सिनेअभिनेत्री रविना टंडन या व्यवसायिक द्रुष्टीकोनातून चिमूर तालुक्यातील बांबू रिसोर्ट जवळ शेतजमीन घेण्याच्या प्रयत्नात आहे अशीही माहिती मिळाली आहे.