लोकसत्ता टीम

नागपूर : गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर गडचिरोलीतून आलेल्या एका बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक-नाशक पथकाने बॉम्बसदृष्य वस्तू ताब्यात घेतली. सुराबर्डी येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र, डेपो व्यवस्थापकाने चालकाला फोन करून माहिती घेतली असता ती वस्तू बॉम्ब नसून केवळ आग विझविण्याचे लहान आकाराचे अग्निशमन यंत्र (फायर इंस्टींग्युटर) असल्याचे सांगितले. त्यामुळे बॉम्ब शोध व नाशक पथक, श्वान पथक, दहशतवाद विरोधी पथक, गुप्तचर यंत्रणा आणि गणेशपेठ पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
cargo vehicle caught fire on Mumbai Ahmedabad National Highway
महामार्गावर मालवाहतूक वाहनाला भीषण आग, मालजीपाडा वासमाऱ्या पुलाजवळील घटना

बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास बुटीबोरी जवळील रिधोरी येथे बस ब्रेक डाऊन झाल्याची माहीती डेपो व्यवस्थापक गौतम शेंडे यांना मिळाली. तांत्रिक कर्मचारी नितीन राऊत सामानासह गडचिरोली डेपोच्या बसने (एमएच-४०-वाय-५०९७) घटनास्थळी पोहोचले. काम आटोपल्यानंतर ११.४० वाजता गणेशपेठ स्थानकावर बस घेऊन आले. बस थांबवून खाली उतरत असताना त्यांना केबिनमध्येच डोमच्या आकारातील आणि फिल्टरसारखी एक वस्तू दिसली. डेपो व्यवस्थापक शेंडे यांनी गणेशपेठ पोलिसांना कळविले.

आणखी वाचा-नागपूर : ३१७ गुन्हेगारांची आयुक्तांनी घेतली परेड, गुन्हेगारांची ‘डेटा बँक’ तयार

काही वेळातच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. बीडीडीएस आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. दहशतवादी विरोधी पथक, गुप्तचर यंत्रणाही पोहोचली. संपूर्ण परिसरत रिकामा करण्यात आला. दरम्यान पोलिस उपायुक्त गोरख भामरे, उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या उपस्थितीत बसमधून ती वस्तू काढून तपासासाठी सूराबर्डी येथे पाठविण्यात आली. दरम्यान, त्या बसच्या चालकाशी पोलिसांनी संपर्क केला. त्याला बॉम्बसदृष्य वस्तूबाबत विचारणा केली. ‘तो बॉम्ब नसून केवळ आग विझविण्याचे लहान आकाराचे अग्निशमन यंत्र (फायर इंस्टींग्युटर) आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यातील रेडमॅटिक कंपनीने गडचिरोली आगारातील जवळपास सर्वच बसमध्ये ते यंत्र दिले आहे. बसमध्ये अचानक आग लागल्यानंतर त्या यंत्राचा ताबडतोब वापर करता यावा, यासाठी चालकाच्या कॅबिनमध्ये ठेवण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी खात्री पटली.

समाजमाध्यमांमुळे उडाला गोंधळ

गडचिरोली आगारातील प्रत्येक बसमध्ये अग्निशमन यंत्र बसविण्यात आले आहेत. समाजमाध्यमांवर सकाळी अफवा उडाली आणि ती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे गोंधळ उडाला. गेल्या अनेक वर्षांपासून बॉम्ब शोधक-नाशकाचे कर्तव्य बजाविणाऱ्या एकाही पोलिसाला बॉम्ब नसल्याचे लक्षात आले नाही, हेसुद्धा आश्चर्यच आहे. अग्निशमन यंत्राला पोलीसही दिवसभार बॉम्ब असल्याचे माध्यमांना सांगत फिरत होते, हे विशेष.