नागपूर : जबलपूरवरून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने इंडिगो विमानाचे नागपूर विमानतळावर आज सकाळी इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले. नागपुरात प्रवाशांना उतरवल्या नंतर नेमके काय झाले ते समजले आणि प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. प्रवासी आणि विमानतळावर तणावाचे वातावरण होते.
विमानातील प्रवाशांचे सामान विमानात ठेवून प्रवाशांना बाहेर काढले गेले. विमानाची बॉम्ब स्क्वाड, श्वान पथक, स्थानिक बॉम्ब नाशक पथक तपासणी केली. नागपूर विमानतळावरून सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार असल्याने विमानतळ प्रशासन आधीच अलर्टवर होते. याच दरम्यान बॉम्बची अफवा उडाल्याने खळबळ उडाली.
इंडिगोचे विमान रविवारी सकाळी ७.५५ वाजता जबलपूरहून निघाले. विमान उतरल्यावर प्रवाशांचे सर्व सामान, मोबाईल फोन्स फ्लाइटच्या आत ठेवण्यात आले आहेत, तर प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले आहे. एवढेच नाही तर या विमानाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेढा घातला. कसून तपासणी करण्यात आली. प्रवाशांना बसने हैदराबादला नेण्यात आले आहे.
सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आणि सुरक्षा तपासणी तातडीने करण्यात आली. प्रवाशांना अल्पोपहार देण्यात आला. तपासणीत काहीही संशयास्पद आढळले नाही. विमानाच्या वॉशरूममध्ये ठेवलेल्या चिठ्ठीत बॉम्ब ठेवण्यात आला आले,असे लिहिले आढळून आले. सुरक्षा यंत्रणांनी व्यापक शोध घेतल्यानंतर काहीही संशयास्पद आढळले नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा…भूतबाधेच्या नावावर आई, मुलगी, मामी आणि आजीवर बलात्कार; भोंदूबाबाला अखेर…
काय घडले
इंडिगो फ्लाइट ६इ-७३०८ जबलपूर ते हैदराबादला जाणारी विमान १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी सकाळी ९.२२ वाजता बॉम्बच्या धमकीच्या संदेशामुळे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आली. ज्योतिस्मिता सैकिया नावाच्या केबिन क्रूला स्वच्छतागृहात वापरत असलेल्या टॉयलेट रोलच्या तुकड्यावर निळ्या रंगाच्या शाईने लिहिलेला संदेश आढळला ज्यात ‘ब्लॉस्ट अट ९.०० एएम’ असे नमूद होते. त्यानंतर, वैमानिकाने एरिया कंट्रोल नागपूरला सकाळी ८.५६ वाजता माहिती दिली.