नागपूर : एक व्यक्ती, एक मत आणि एक किमंत हे लोकशाहीचे तत्व आहे. मात्र अनेकदा काही उच्चपदस्थ अधिकारी मतदानाला आले की थेट मतदान कक्षात प्रवेश करतात. मात्र शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत लागून मतदानाचे कर्तव्य पार पाडले.
हेही वाचा… नागपुरात दडपशाही? भाजपविरोधी भूमिका मांडणाऱ्यांचे मतदार याद्यांमधून नावे गहाळ, मतदार म्हणतात…
हेही वाचा… आयोगाचे ओळखपत्र, पण यादीतून नाव गहाळ, मतदारांमध्ये संताप “एमटी” मालिकेतील नावे गाळली
न्या. सांबरे यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या धंतोली येथील सुळे हायस्कूलमधील मतदान केंद्रावर मतदान केले. येथे मतदारांची मोठी रांग होती. परंतु, न्या. सांबरे हे रांगेतच लागले व सर्वसामान्यांप्रमाणेच मतदान केले. न्यायमूर्ती न्यायालयाच्या माध्यमांतून समानतेचे रक्षण करतात. न्यायमूर्तींनी मतदानादरम्यान आपल्या वागणुकीतून याची प्रचिती दिली. त्यांच्या या कृतीचे सर्व उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.