बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) ने पक्षीमित्रांसाठी एक महत्वपूर्ण मोबाइल ऍप तयार केले असून महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पक्षी विषयक संशोधन करणाऱ्या संशोधकांना ते उपयुक्त होणार आहे.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी भारतातील १४० वर्षे जुनी संस्था असून पक्षी अभ्यास व पक्षी शास्त्रातील महत्वपूर्ण संशोधन कार्यासाठी संपूर्ण जगात सुपरिचित आहे. बीएनएचएस भारत सरकारच्या वने आणि पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या “पर्यावरण माहिती, जनजागरण, क्षमता विकास आणि उपजीविका कार्यक्रम (ईआईएसीपी) या कार्यक्रमावर काम करीत आहे.

हेही वाचा >>>धक्कादायक… करोनानंतर ‘सिझेरियन’द्वारे प्रसूतीचे प्रमाण वाढले!

Rajput Gardens
मुघल गार्डन्सची जितकी चर्चा होते, तितकी ‘राजपूत गार्डन्स’ची का होत नाही?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Thousands of foreign birds arrived in Uran with flamingos moving due to Water bodies dried
उरणमध्ये फ्लेमिंगो नव्या पाणथळींच्या शोधात
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
rushikesh wagh junnar taluka
संशोधनातील वाघ
Himalayan vulture loksatta news
Himalayan Vulture : उरणमध्ये हिमालयीन गिधाडाला जीवदान
radhakrishna vikhe patil statement on baramati district creation
बारामती स्वतंत्र जिल्हा निर्मितीची अफवा; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
Mumbai Municipal Corporation School,
मुंबई : शैक्षणिक वर्षाच्या सांगतेला व्याकरणाची सुरुवात 

याअंतर्गत विद्यार्थ्यांना व संशोधकांना भारतीय पक्ष्यांबद्दल सहज माहिती उपलब्ध व्हावी यासाठी संस्थेने ‘AviEco Base’ नावाचे मोबाइल ॲप्लिकेशन विकसित केले आहे. बीएनएचएस- ईआईएसीपी या कार्यक्रमाअंतर्गत भारतातील विद्यार्थी व संशोधकांना या मोबाइल ॲप्लिकेशनच्या सहाय्याने भारतात आढळणाऱ्या पक्ष्यांचा संदर्भ शोधण्यास मदत व्हावी या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता.

या ॲप्लिकेशनमध्ये संशोधनासाठी संदर्भ शोधण्यासाठी मदत व्हावी यासाठी विविध प्रकारचे फिल्टर्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संदर्भामध्ये प्रजातींचे नाव, जर्नलचे नाव, प्रकाशनाचे वर्ष, लेखकांची नावे, राज्य आणि श्रेणी समाविष्ट आहे. अधिक खोलवर माहितीसाठी तसेच तपशीलासाठी “फीडिंग,” “ब्रीडिंग,” “साइटिंग्स,” “रुस्टिंग, ” इत्यादी शब्द वापरून संदर्भ शोधणे आत्ता शक्य झाले आहे असे बीएनएचएसचे कार्यक्रम प्रमुख नंदकिशोर दुधे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>>नागपूर : ‘ब्रेक अप’ करणाऱ्या तरुणीच्या घरात प्रियकर चाकू घेऊन…

बीएनएचएसचे सहाय्यक संचालक डॉ. सुजीत नरवडे यांनी या उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिली. या ॲप्लिकेशन मध्ये २४,००० पेक्षा जास्त संदर्भसूची समाविष्ट असून यात जर्नल ऑफ द बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसाईटी, हॉर्नबिल, बर्डलाइफ इंटरनॅशनल, इंडियन बर्ड्स, फोर्कटेल इत्यादीं शोध पत्रिका मधील संशोधन साहित्याचा यात समावेश करण्यात आलेला आहे.शोध प्रक्रिया जलद आणि सुलभ करण्यासाठी पक्ष्यांची नावे असलेली यादी ड्रॉप-डाउन ३ मेनू मध्ये दिलेली आहे. शोधलेले संधर्भ डाऊनलोड करण्यासासठी सिंगल-टॅप डाऊनलोड हा पर्याय देण्यात आलेला आहे.

हे मोबाइल ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असून ते खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करता येईल.
.https://play.google.com/store/apps/details?id=com.bibliography.project

Story img Loader