काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ वाशीम जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी दाखल होत आहे. त्याअनुषंगाने राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंडळी या यात्रेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यात मुक्कामी येणार आहेत. त्यांच्या निवासासाठी वाशीम शहरातील व इतर ठिकाणच्या सर्वच्या सर्व हॉटेल्स बुक केले आहेत. उर्वरित हॉटेल्स देखील बुक होणार आहेत.

हेही वाचा >>>नागपूर : भारत जोडो’ यात्रेकरिता उद्या दुचाकी मिरवणूक

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
Mangal rashi parivartan 2024
मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या लोकांना पुढील १३८ दिवस होणार आकस्मिक धनलाभ
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ जिल्ह्यात दाखल होत असून काँग्रेसच्या वतीने नियोजनाची कडेकोट व्यवस्था करण्यात येत असून बैठकावर बैठका घेतल्या जात आहेत. राहुल यांच्यासोबत असलेल्या मान्यवरांची स्वतंत्र व्यवस्था आहे. मात्र, जिल्ह्याबाहेरील काँग्रेस नेत्यांच्या निवासासाठी वाशीम शहरातील एवेंटो, व्यंकटेश, वाटाणे लॉन तसेच इतर हॉटेल्स व मंगल कार्यालये बुक होत आहेत. याशिवाय कारंजा, मंगरूळपीर, मनोरा व इतर शहरातील सर्वच्या सर्व हॉटेल्स, मंगल कार्यालये बुक करण्यात येत असून हॉटेल व्यवसाय तेजीत आला आहे. लोकांची संख्या वाढल्यास काँग्रेसचे सभापती निवासस्थान येथेही राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षांपासून करोना महामारी असल्याने हॉटेल व्यवसाय मंदावला होता. परंतु, भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील हॉटेल्स व्यवसाय तेजीत आला आहे.