लोकसत्ता टीम

नागपूर : मिहान परिसरात दागिने निर्मितीसाठी एक ‘क्लस्टर’ मिळणार आहे. तेथे अद्ययावत दागिने निर्मिती हब झाल्यास सुवर्ण अलंकार व्यवसायाला बळ मिळेल, असा विश्वास उपराजधानीतील सराफा व्यावसायिक राजेश रोकडे, राजेश लोंदे, अंशुल हरडे, हर्षल दारोडकर यांनी व्यक्त केले. लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.

Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा

यावेळी ऑल इंडिया जेम ॲन्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी)चे उपाध्यक्ष व रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे म्हणाले, राज्यात मुंबई, पुण्यानंतर नागपूर हे झपाट्याने विकसित होत आहे. देशाच्या मध्यभागी असल्याने व येथे ट्रान्सपोर्टसह इतर सगळ्याच सोयी असल्याने देशातील कोणत्याही राज्यातून सहज पोहचता येते. येथील मिहान या औद्योगिक क्षेत्राचाही झपाट्याने विकास होत आहे.

आणख वाचा-रेल्वेतून पडून चेहरा विस्कटलेल्या रुग्णाला जीवदान; मेडिकलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुढाकार घेत सुवर्ण अलंकार व्यवसायासाठी मिहानमध्ये ३ एकर जागा देऊ केली आहे. त्यानुसार जीजेसीतर्फे अर्जही करण्यात आला आहे. लवकरच ही जागा मिळेल. त्यानंतर येथे दागिने निर्मिती क्षेत्राच्या विकासाठीसाठी नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले जातील. दागिन्यांच्या नवनवीन डिझाईन्स विकसित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व यंत्र उपलब्ध होईल. सोबत येथे कुशल कारागीर तयार करण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारले जाईल. त्यामुळे नागपुरातील दागिन्यांना मागणी वाढेल, असेही रोकडे म्हणाले. लोंदे ज्वेलर्सचे संचालक राजेश लोंदे म्हणाले, नागपुरात आंतराष्ट्रीय विमानतळ असून शहर हब झाल्यास देश-विदेशात नागपुरातील दागिन्यांना मागणी वाढेल. हरडे ज्वेलर्सचे अंशुल हरडे म्हणाले, या हबमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे नवीन पिढीतील तरुण पुन्हा सराफा व्यवसायाकडे वळतील. श्री मेहेर ज्वेलर्सचे हर्षल दारोडकर म्हणाले, नागपूर हे देशाचे हृदय आहे. विदर्भातील जंगल व जंगली प्राणी देश-विदेशातील नागरिकांचे आकर्षण आहे. त्यामुळे येथे पर्यटन वाढून जगभरातील पर्यटकांकडून दागिन्यांनाही मागणी वाढत आहे.

आणखी वाचा-संघाच्या दसरा मेळाव्यात गडकरी, फडणवीसांची उपस्थिती

दागिने घडवण्याचे दर कमी होणार

नागपुरात दागिने निर्मिती हब झाल्यास नवनवीन दागिने तयार करण्याची स्पर्धा वाढेल. सोबतच दागिने निर्मितीचे प्रमाणही वाढेल. दागिने सध्या थोक विक्रेते ते किरकोळ विक्रेते या अशा साखळीतून मिळतात. परंतु हबमुळे उत्पादक ते थेट ग्राहक उपलब्ध होतील. त्यामुळे नागपुरात दागिने तयार करण्याचे दर काही प्रमाणात कमी होतील, असे राजेश रोकडे म्हणाले.

करोनानंतर सोन्यात गुंतवणुकीवर विश्वास

करोनामध्ये अनेक जण आजारी पडले. उपचारासाठी अनेकांना संपत्ती विकताना खूप अडचणी आल्या . परंतु सोने-चांदीच्या दागिन्यातून सहज निधी जमवता आला. त्यामुळे गुंतवणूकीचे महत्त्व आता सगळ्यांना कळू लागले आहे. नवीन पिढीही दागिन्यांकडे आकर्षित होत आहे, असे राजेश लोंदे म्हणाले.

चांगला परतावा

सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या पाच वर्षांचे निरीक्षण केल्यास हे दर प्रति दहा ग्रॅम ३५ हजारांवरून आता ६१ हजारांच्या जवळपास गेले आहेत. त्यामुळे सोने-चांदीच्या गुंतवणूकीतून हमखास चांगला परतावा मिळत असल्याचा विश्वास ग्राहकांमध्ये रूढ होत आहे, असे अंशुल हरडे यांनी सांगितले.

कौटुंबिक सराफा संकल्पना कायमच

नागपुरात आजही ग्राहकांचा कौटुंबिक व्यावसायिकांवर विश्वास आहे. त्यामुळे ते या व्यावसायिकांकडेच दागिने खरेदीसाठी जातात. दरम्यान, आता तर ग्राहकांना देयकात सोने-चांदी, हिऱ्यांचे वजन ते किती कॅरेट आहे, अशी सर्व माहिती लिहून दिली जाते. त्यामुळे फसवणुकीची शक्यता नाही. परंतु ग्राहकांनी संबंधित सराफा व्यावसायिकाकडून पक्के देयक घ्यायला हवे, असे हर्षल दारोडकर म्हणाले.

Story img Loader