नागपूर : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा- २ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘एम. एस. ई. बी.’ सोलर अ‍ॅग्रो पॉवर मर्यादित कंपनी’ची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीच्या पहिल्या संचालक मंडळाची बैठकही नुकतीच मुंबईत झाली.

हेही वाचा – “हे महाविकास आघाडीचे सरकार नाही, पवारांची काळजी घेऊ”, काय म्हणाले नितेश राणे?

शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा- २ (मिशन-२०२५) ही योजना आणली. त्यानुसार ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत राज्यात ७ हजार मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने ‘एम. एस. ई. बी. सोलर अ‍ॅग्रो पॉवर मर्यादित’ ही विशेष हेतू कंपनी स्थापन केली. ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी मर्यादितची उपकंपनी म्हणून काम करेल. कंपनीच्या संचालक मंडळाची पहिली बैठक नुकतीच कार्यालयात झाली.

Story img Loader