वर्धा : पर्यटनाचे क्षेत्र एकसंघ असणे प्रशासकीय दृष्ट्या सोयीचे ठरत असल्याचे म्हटल्या जाते. असा बोर व्याघ्र प्रकल्पातील खोळंबा आता दूर करण्यात आला आहे. त्यासाठी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा चालविला होता. अखेर तो आदेश निघाला.
वर्धा व नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील बोर प्रकल्प देशात सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखल्या जातो. २०१२ ला नवीन क्षेत्राचा समावेश केला होता. त्यामुळे जुना व नवा असे दोन भाग झाले. त्याशिवाय राखीव बफर क्षेत्र होतेच. प्रशासकीय दृष्टीने हे कटकटीचे ठरत असल्याची ओरड होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

म्हणून हे दोन्ही एकत्र व्हावे, अशी मागणी डॉ.भोयर यांनी केली. ती मान्य झाल्याने कडवस, हिंगणी व बांगडापुरचे मिळून सातशे वर क्षेत्र एकत्रित झाले आहे. विशेष म्हणजे, या एकसंघ बोर प्रकल्पाचे मुख्यालय वर्धेत राहणार असून उपसंचालक दर्जाचा अधिकारी काम पाहणार तर पेंच प्रकल्पाचे संचालक नियंत्रण ठेवणार.वर्धा व नागपूर जिल्ह्यातील बारा परिमंडळाचा यात समावेश झाला आहे. आमदार भोयर म्हणाले की क्षेत्रात वाढ झाल्याने प्राण्यांना मुक्तसंचार करण्यास मोठी जागा उपलब्ध झाली आहे.वनमंत्री मुनगंटीवार यांनी ही बाब ओळखून प्रस्ताव तात्काळ संमत केला.आता पर्यटन विकास व स्थानिकांना रोजगार या दोन्ही गोष्टी शक्य होणार.