नागपूर: शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज पुरवठा व्हावा म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत २ मेगावॅटचा बोर्गी, तालुका जत, जिल्हा सांगली येथील सौर ऊर्जा प्रकल्प २ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी कार्यान्वित करण्यात महानिर्मितीला यश आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बोर्गीतील नवीन सौर ऊर्जा प्रकल्पामुळे या गावातील सुमारे ५०० कृषी वीज ग्राहकांना सौर ऊर्जेचा लाभ होऊन, विशेषतः ५ एच.पी.चे सुमारे ५२० कृषी पंप ऊर्जित होणार आहेत. हा प्रकल्प महावितरणच्या ३३/११ के.व्ही. बोर्गी उपकेंद्राला जोडण्यात आला आहे. ४ हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्प उभारणीचा खर्च सुमारे ८ कोटी इतका आहे. महानिर्मिती, मेसर्स ई.ई.एस.एल.(विकासक), मेसर्स टाटा पॉवर सोलर (सब व्हेंडर) आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने महानिर्मितीची एकूण सौर ऊर्जा स्थापित क्षमता ३७८.०२ मेगावाट इतकी झाली आहे. या सौर प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष २० व्यक्तींना रोजगार मिळाला आहे.

हेही वाचा >>>हत्या प्रकरणातील आरोपी आत्महत्येसाठी झाडावर चढला, उडी घेणार…. तब्बल दोन तास अख्खे पोलीस प्रशासन वेठीस

या प्रकल्पातून उत्पादित होणाच्या विजेकरिता ३.३० रुपये प्रती युनिट दराने महावितरण समवेत वीज खरेदी करार करण्यात आला आहे. महानिर्मितीच्या दरीकोन्नूर ६.१६ मेगावॅट (तालुका जत, जिल्हा सांगली) येथील सौर ऊर्जा प्रकल्पाची कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. प्रकल्प लवकर कार्यान्वित करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन स्वतः लक्ष घालत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Borgi project of chief minister solar agriculture channel commissioned nagpur mnb 82 amy