लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रपूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन आमदारांना लोकसभा निवडणुकीपर्यंत शांत बसण्यास सांगितले असून पुणे आणि ठाणे यांना सहन केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. लोकसभा निवडणुकीनंतर ठाणे आणि पुणे हे दोघेही जातील असा गौप्यस्फोट राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

वडेट्टीवार म्हणाले, की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन भाजपच्या आमदारांनी भेटून आपली व्यथा मांडली. हे सरकार लुटारूचे सरकार असून या सरकारला नितिमत्ता, नैतिकता, वैचारिकता याचे काही देणेघेणे नाही. बहुमतात असलेल्या सरकारला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याची गरज का पडली, जनता सोबत नसल्यामुळे भाजपला भीती बळावल्याने असा प्रकार घडला. भाजपच्या दोन आमदारांनी फडणवीसांकडे तक्रार करीत आमची बदनामी होत आहे, जनता शिव्या देत आहे. पुणे आणि ठाणे यांच्यामुळे आम्हाला कोणताही फायदा होत नसून उलट आपली नुकसान होत असल्याची व्यथा बोलून दाखविली.

आणखी वाचा-जिल्हा परिषद भरती : शुल्कासाठी पैशाचा तुटवडा, चक्क जागतिक बँकेकडे केली कर्जाची मागणी

यावर फडणवीसांनी दोन्ही आमदारांना सबुरीचा सल्ला देत लोकसभा निवडणूकीपर्यंत शांत बसण्यास सांगितले असून निवडणूकीनंतर ठाणे आणि पुणे हे दोघेही जातील असे वडेट्टीवार म्हणाले.