गोंदिया : दुकानातून घरी जात असलेल्या ९ वर्षीय मुलाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने चिरडले. यात मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० वा.च्या सुमारास शहरातील बा चौकात घडली. घटनेनंतर संतप्त तमावाने ट्रक पेटवून दिला. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राफन अफरोज शेख (९, रा. बाजपाई चौक, गोंदिया) असे मृत मुलाचे नाव आहे. मुलाच्या मृत्यूनंतर परिसरातील जमाव संतप्त झाला. जमावाने ट्रक जाळला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. रामनवमीचा उत्सव तसेच रमजान महिना सुरू असल्यामुळे परिस्थिती चिघळू नये म्हणून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boy accident truck angry people truck on fire tension in the area sar 75 ysh