नागपूर : सावनेर येथे नऊ वर्षीय मुलगा एका ‘बॅटरी’सोबत खेळत होता. ‘बॅटरी’मधील वायर दुसऱ्या एका वस्तूला जोडताच ती गरम होऊन तिचा स्फोट झाला. त्यात मुलाच्या उजव्या गालाचे मांस फाटले. मुलाला अत्यवस्थ अवस्थेत मेडिकलमध्ये दाखल केले असून तज्ज्ञ डॉक्टर त्यावर लक्ष ठेवून आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोहम (बदललेले नाव) असे मुलाचे नाव आहे. तो सावनेर परिसरात राहतो. गुरुवारी सकाळी त्याला एक ‘बॅटरी’ सापडली. या ‘बॅटरी’सोबत खेळताना त्याने काही ‘इलेक्ट्राॅनिक’ खेळण्याला त्याचे वायर लावले.

हेही वाचा – चंद्रपूर : पुष्पा पोडे यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार; महाराष्ट्रातील एकमेव परिचारिका

काही वेळात ती ‘बॅटरी’ गरम झाली. ‘बॅटरी’ गालाजवळ आणताच त्याचा स्फोट झाला. त्यात मुलाच्या उजव्या गालाचे मांस फाटून रक्तस्त्राव सुरू झाला. कुटुंबीयांनी झटपट मुलाला उचलून सावनेरच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. येथे प्राथमिक उपचार करून मुलाची खालवणारी प्रकृती बघता त्याला तातडीने नागपुरातील मेडिकल रुग्णालयात हलवले.

हेही वाचा – “फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरे यांनी चोरले”; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “पुत्र प्रेमात धृतराष्ट्र…”

मेडिकलच्या ट्रामा केअर सेंटरला तातडीने कान-नाक-घसा रोग विभाग, शल्यक्रिया विभाग, नेत्ररोग विभाग, प्लास्टिक सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी एक-एक करून मुलाची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर विविध वैद्यकीय तपासणी करून झटपट उपचार सुरू केले. सध्या मुलाची प्रकृती स्थिर असून ‘सीटी स्कॅन’च्या अहवालानंतर मुलावरील उपचाराची दिशा निश्चित केली जाणार आहे. सध्या मुलाला वेदनाशमन औषधी व इंजेक्शन देऊन त्यावर औषधोपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boy injured due to battery explosion in savner mnb 82 ssb
Show comments