नागपूर : गृहमंत्र्याच्या शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून हत्याकांडाचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. शहरातील गँगवार आणि हत्याकांडासारख्या घटनांवर पोलिसांनी नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. हत्याकांडाची आणखी एक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दहावीत शिकणाऱ्या मुलाने आईच्या मदतीने वडिलाचा गळा आवळून खून केला. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करुन अल्पवयीन मुलगा व त्याच्या आईला ताब्यात घेतले आहे. मुकेश (५७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश हा एका हार्डवेअरच्या दुकानात विक्री प्रतिनिधी म्हणून कामाला होता. त्याला पत्नी निर्मला व दोन मुले आहेत. १९ वर्षाचा मोठा मुलगा हा पुण्यात एका कंपनीत नोकरी करतो. तर लहान मुलगा बंटी (काल्पनिक नाव) हा दहावीत शिकतो. आई निर्मला ही मिळेल ते काम करते. घरीच परिस्थिती बेताची असल्यामुळे मोठ्या मुलाला शिक्षण सोडून पुण्यात नोकरीसाठी जावे लागले, तर अभ्यासात हुशार असलेला लहान मुलगा बंटीसुद्धा सुटीच्या दिवशी कामाला जातो. मुकेशला दारुचे व्यसन होते. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे दारुचे व्यसन खूप वाढले. घरातील वस्तू-सामान विकून तो दारु पीत होता. तसेच दारुच्या नशेत मायलेकाला शिवीगाळ व मारहाण करीत होता. त्यामुळे पत्नी व मुलगा मुकेशच्या त्रासाला कंटाळले होते. दारु पिऊन आल्यानंतर घरात वाद करणे आणि मारहाण करणे हे नित्याचेच झाले होते. रविवारी रात्री ११ वाजता मुकेश दारु पिऊन घरी आला. त्याने पत्नी निर्मलाला शिवीगाळ आणि मारहाण केली. मुलगा बंटी दोघांचा वाद सोडविण्यासाठी गेला. त्यालाही वडिलांनी मारहाण केली. मुकेशने पोटात लाथ मारल्यामुळे आई तडफडत होती. त्यामुळे बंटीचा राग अनावर झाला. त्याने घरातील टॉवेलने त्याच्या वडिलांचा गळा आवळला. काही मिनिटातच मुकेशचा जीव गेला.

हेही वाचा…भाजप सदस्य नोंदणी! आधीच घायकुतीस, त्यात पुन्हा टार्गेट वाढले; आता दिमतीस तंत्रज्ञ…

मित्रामुळे आले हत्याकांड उघडकीस

मुलाने वडिलाचा खून केल्याचे आईच्या लक्षात येताच तिने डोक्यावर हात मारला. परंतु, रागाच्या भरात हे कृत्य घडल्यामुळे आईने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. मृतदेह नदीत फेकण्याचे नियोजन केले. त्यासाठी बंटीने आपल्या एका मित्राला फोन केला आणि घडलेली घटना सांगितली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत मागितली. मात्र, मित्राने त्याची भेट घेतली आणि समजूत घातली. पोलिसांत जाऊन सर्व घटना सांगण्यास सांगितले. दोघेही हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांची भेट घेऊन घटना सांगितली. त्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. या प्रकरणी हत्याकांडाचा गुन्हा नोंदविला आणि मायलेकांना ताब्यात घेतले.