यवतमाळ येथील पत्रकार परिषदेतील भूमिकेवरून आज विविध पत्रकार संघटनांनी भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला. मात्र, चित्रा वाघ आपल्या भूमिकेवर ठाम असून, यवतमाळला प्रश्न विचारणारे ज्येष्ठ व कोणत्या वृत्तपत्राचे हे नंतर कळले, अशी प्रतिक्रिया देत वाघ यांनी दिलगिरी व्यक्त करण्याचा चकार शब्दही काढला नाही.

यवतमाळ येथील पत्रकाराबाबत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. वर्ध्यात विविध पत्रकार संघटनांनी त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. तसे चित्रही पहायला मिळाले. यानंतर भाजपचे प्रसिद्धी प्रमुख सारंग रघाताटे यांनी चित्रा वाघ आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली नसल्याचे ते म्हणाले.

Story img Loader