यवतमाळ : इन्स्टाग्रामवर बहरलेल्या प्रेमाची फलश्रुती प्रेयसीचे अश्लील फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात झाली. या प्रकरणी चाकण (पुणे) येथील तरुणाविरुद्ध नेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नेर तालुक्यातील युवतीचे चाकण (पुणे) येथील युवकासोबत इन्स्टाग्रामवर प्रेम फुलले. मात्र, युवतीचे लग्न झाल्यावरही प्रियकर तिला सोडायला तयार नव्हता. अखेर त्याने तिचे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर टाकले. युवतीने नेर पोलिसात तक्रार केल्यावर युवकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेर तालुक्यातील युवतीचे आरोपी निशिकांत डुमोरे (२२, चाकण- पुणे) याच्याशी इन्स्टाग्रामवर प्रेम जुळले. हे प्रेम व्हिडीओ कॉलिंगवर फुलत असताना निशिकांतने व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केले. आता मुलीचे लग्न जुळल्याने तिने निशिकांतला टाळणे सुरू केले. यामुळे चिडलेल्या निशिकांतने तिचे त्या कॉलिंगच्या व्हिडीओवरून फोटो काढून व्हायरल केले. या प्रकरणी निशिकांत डुमोरे याच्या विरोधात नेर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव करीत आहेत.