नागपूर : शेतातील शेळीपालन केंद्रात काम करणाऱ्या युवकाने १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती चार महिन्यांची गर्भवती झाली.

प्रियकराने तिला परस्पर गर्भपातासाठी झाडपाला दिला आणि तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे ही बाब तिच्या आईच्या लक्षात आली. या प्रकरणी बेला पोलिसांनी प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. विशाल अंकुश भोडमाके (२५, बोरीमजरा, ता. उमरेड) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

Gadchiroli crime news husband Electric shock sleeping wife
गडचिरोली : खळबळजनक! झोपलेल्या पत्नीला दिला विजेचा ‘शॉक’…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
UP Murder Case
Alimony : पत्नीला पाच लाखांची पोटगी देणं टाळण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य, पत्नीला चंडी देवीच्या दर्शनाला नेलं अन् काढला काटा
tiger attack speeding bike Pimpalgaon Lakhni Taluka bhandara two injured
भंडारा : रात्रीचा थरार! वेगाने जाणाऱ्या दुचाकीवर अचानक वाघाने घेतली झेप…
Crime News in marathi
Crime News : २५ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर उलगडली छळाची आणि शोषणाची अंगावर काटा आणणारी कहाणी, कुठे घडली घटना?
palghar social worker Ashok Dhodi kidnapped murdered
अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत
girl died in road accident parents donated their organs giving life to six people
अपघातात जीव गमावूनही तिनं दिलं सहा जणांना जीवदान…
IT girl murder, rape case, Mumbai,
विश्लेषण : मुंबईत आयटी तरुणी हत्या, बलात्कार प्रकरणात तपासातील त्रुटींमुळे आरोपी निर्दोष… नेमके प्रकरण काय होते?

हेही वाचा – नागपूर : राष्ट्रपतींनी फेटाळली दया याचिका; ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारणाऱ्या नराधम वसंता दुपारेची फाशीची शिक्षा अटळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय मुलगी मोनाली (बदललेले नाव) ही मूळची भंडारा जिल्ह्यातील आहे. ती आईवडिलांसह नागपुरातील बेला शहराजवळील एका शेतातील शेळीपालन केंद्रात कामाला आली होती. आईवडिली शेतातील काम आणि शेळीपालन केंद्रात काम करीत होते.

तेथेच शेतमजूर म्हणून विशाल भोडमाके हा कामाला होता. त्याची नजर मोनालीकडे गेली. त्याने तिच्याशी संबंध वाढवले. तिचे आईवडिल घरी नसताना तिच्याशी गोडीगुलाबी लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला शेतीकाम सोडून शिक्षणासाठी शहरात पाठविण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे तीसुद्धा त्याच्या प्रेमात अडकली.

आईवडिल शेतात निघून गेल्यानंतर विशालने तिला केंद्रातील एका खोलीत नेले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर विशालने तिला वेळोवेळी जंगलात नेऊन लैंगिक शोषण केले. यातून ती गर्भवती झाली. तिसऱ्या महिन्यात तिला गर्भवती असल्याचे लक्षात आले. तिने प्रियकर विशालला कल्पना दिली.

हेही वाचा – ‘फॅन्सी’ नंबरची ‘क्रेझ’! चंद्रपूरकरांनी आवडीच्या नंबरसाठी मोजले तब्बल ४२ लाख ८५ हजार

दोघेही घाबरले पण त्यांना काहीही सूचत नव्हते. विशालने काहीतरी झाडपाला आणला आणि तिला खायला दिला. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली. मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे आईने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासले आणि मुलगी गर्भवती असून तिने गर्भपाताचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली. आईने मोनालीला आस्थेने विचारपूस केल्यानंतर तिने विशालचे नाव सांगितले. भंडाऱ्यातील पोलीस ठाण्यात तिच्या आईने तक्रार नोंदविली.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनास्थळ असलेल्या बेला पोलीस ठाण्यात प्रकरण तपासासाठी वर्ग करण्यात आले. बेला पोलिसांनी आरोपी विशालला अटक केली असून त्याने प्रेमसंबंधातून कृत्य केल्याची कबुली दिली.

Story img Loader