इंस्टाग्रामवरून झालेल्या मैत्रीतून सूत जुळून शारीरिक संबंध ठेवल्याने गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीने घरगुती उपाय करून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मुलीची प्रकृती खालावल्याने आजीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा भयानक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी मुलीच्या प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी आजीसह राहते आणि ती अकराव्या वर्गात शिकते. तिची गेल्या वर्षभरापूर्वी तिची इंस्टाग्रामवरून आरोपी साहिल सरकानिया (१९, उत्तरप्रदेश) याच्याशी ओळख झाली.
हेही वाचा >>> ‘पैसे दे नाहीतर बायकोला विक’; देसाईगंजमधील सावकाराच्या ऑडियो क्लिपने खळबळ
दोघेही प्रेमात पडले. मुलीच्या प्रेमात वेडा झालेल्या साहिलने तिला भेटण्यासाठी उत्तरप्रदेशवरून थेट नागपूर गाठले. त्याने जानेवारी महिन्यात मुलीच्या घराशेजारी खोली भाड्याने घेतली आणि तेथे राहू लागला. त्याने एका किराणा दुकानात काम करणे सुरु केले. दोघेही त्याच्या खोलीवर राहायला लागले. त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती दोन महिन्यांची गर्भवती झाली. तिने साहिलले सांगितले. त्यानंतर दोघेही गोंधळले.परिचित महिलेने तिला गर्भपातासाठी घरगुती उपाय करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रक्तस्त्राव झाल्यामुळे तिची प्रकृती खालावली. तिला आजीने रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणीअंती खरा प्रकार उघडकीस आल्याचे बेलतरोडी पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आजीच्या तक्रारीवरून साहिलवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली.