अकोला : घराजवळच राहणाऱ्या युवक-युवतीचे १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, प्रियकराने दुसरीशीच लग्न उरकले. त्यामुळे प्रेयसी प्रचंड संतापली. तिने आपला भाऊ व त्याच्या साथीदारासह पूर्वाश्रमीच्या प्रियकराला चांगलाच चोप दिला. हे प्रकरण पोलिसात गेल्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

बाळापूर तालुक्यातील कासारखेड येथील २६ वर्षीय युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे गावातील एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. १० वर्षांपर्यंत त्यांचे प्रेमसंबंध फुलले होते. दरम्यान, प्रियकर युवकाचे दुसऱ्या युवतीसोबत लग्न झाले. त्यामुळे त्याने प्रेयसीसोबत बोलणे बंद केले. तिच्याशी संपर्क ठेवण्यास तो टाळाटाळ करत होता. प्रेयसी त्याला सोडायला तयार नव्हती. ती त्याला नियमित संपर्क करत होती.

Youth Addiction, Young Generation, Nagpur Police ,
तरुणांनो प्रेम करा, पण…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
homosexual, Akola , Marriage for money,
अकोला : पैशांसाठी लग्न, पोलीस पत्नीचा छळ अन् पती निघाला समलैंगिक….
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!
UP Woman Elopes With Beggar
भिकाऱ्याच्या प्रेमात बुडाली, सहा मुलांना टाकून महिलेनं ठोकली धूम; पतीकडून गुन्हा दाखल
गर्भपाताची मागणी करणाऱ्या पालकांच्या भूमिकेचे आश्चर्य,उच्च न्यायालयाची टिप्पणी; मुलगी गतिमंद असल्याच्या दाव्यावरूनही ताशेरे
Mother murder daughter Nagpur, Nagpur,
प्रेमात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या मुलीचा आईनेच केला खून, मृतदेहाची विल्हेवाट…
Couples who are ineligible for marriage due to age restrictions are eligible to live-in
वयाच्या अटीमुळे लग्नास अपात्र जोडपे लिव्ह-इन करता पात्र!

हेही वाचा – यवतमाळ: घाटंजी येथील निराश्रीत वृद्धांना बांधून दिले घर; ‘रसिकाश्रय’चा पुढाकार

२३ जून रोजी प्रेयसीने त्याला फोन करून ”मला बोलायचे आहे,” असे सांगत बाळापूर जवळील पारस फाट्यावर बोलावले. फाट्यावर येताच युवकाला प्रेयसीच्या भावाने व त्याच्या मित्राने लोखंडी पाइपने जबर मारहाण करून जखमी केले. या प्रकरणात बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader