प्रेमसंबंध ठेवल्यानंतर शारीरिक संबंधास नकार देणाऱ्या प्रेयसीला मारहाण करून प्रियकराने बलात्कार केला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. केतन दुर्गाप्रसाद माटे (२०, रा. कृषीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय तरुणी रिया (काल्पनिक नाव) ही जरीपटक्यात आईसह राहते. ती एका प्रतिष्ठानात अकाऊंटंट म्हणून नोकरी करते. ती दहावीत असताना एका धार्मिक कार्यक्रमात केतन माटे या युवकाशी ओळख झाली. केतन हा पेंटिंगची कामे करतो. केतनने तिला वेगवेगळे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. शाळेसाठी घरातून बाहेर पडल्यानंतर केतन तिला शाळेऐवजी फिरायला नेत होता. त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा वस्तीत होती.

हेही वाचा : नागपूर : मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार, महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

दोघांच्याही आईवडिलांना केतन-रिया यांच्या प्रेमसंबंधाची माहिती झाली. त्यामुळे केतनच्या आईने रियाच्या आईची भेट घेऊन दोघांचे लग्न उरकून टाकण्याचे ठरवले. तेव्हापासून दोघेही पती-पत्नीप्रमाणे वागत होते. गेल्या काही दिवसांपासून तो रियाच्या घरी येऊन वारंवार शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. रियाच्या आईनेही त्याला फटकारले होते. त्यामुळे त्याने लग्न करण्यास नकार दिला होता.
रिया आणि केतन यांच्यात वारंवार खटके उडत होते. केतन हा रियाच्या घरी आला. त्याने शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच केतनने तिला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला व लग्न करण्यासही नकार दिला. रियाने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून केतनविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

Story img Loader