लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती: येथील बडनेरा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी आरोपीला हुडकून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेमप्रकरणातून विभक्त होण्याचा तरुणीचा निर्णय पसंत न पडल्याने प्रियकर विद्यार्थ्याने तिच्यावर कटरने हल्ला केला आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी ही घटना बुधवारी सकाळी बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडुरा शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी प्रियकराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. संजना शरद वानखडे (१९, रा. कांडली, परतवाडा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सोहम गणेश ढाले (१९, रा. परतवाडा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा… अमरावती: थरारक… अमरावतीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची हत्या, विद्यार्थी जखमी
संजना व सोहम हे दोघेही बडनेरा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान शाखेत प्रथम वर्षाला शिकत होते. शिक्षणासाठी ते दोघेही साईनगर परिसरात भाड्याने वेगवेगळ्या खोली करून राहत होते. त्यांच्यात गेल्या वर्षभरापासून प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोहमच्या त्रासाला संजना कंटाळली होती. तिने सोहमपासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता, पण सोहम हा त्यासाठी तयार नव्हता. त्यावरच चर्चा करण्यासाठी दोघेही आपापल्या खोलीवरून एकमेकांना भेटायला निघाले. दरम्यान, बुधवारी सकाळी संजना व सोहम वडुरा शिवारातील एका नाल्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे नागरिकांना दिसून आले. त्यांनी घटनेची माहिती बडनेरा पोलिसांना दिली.
हेहा वाचा… ॲड. दीपक चटप यांचे फोटो उपराष्ट्रपतींच्या अधिकृत फेसबुक, इंस्टाग्रामवर व्हायरल
संजना व सोहम यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी संजनाला मृत घोषित केले, तर सोहमवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. या प्रकरणी मृत संजनाचे चुलत भाऊ अमित दिलीपराव वानखडे (३७, रा. शंकरनगर) यांनी बडनेरा ठाण्यात तक्रार दाखल केली. सोहम हा आपल्याला खूप मानसिक त्रास देतो, वारंवार जिवानिशी मारण्याची धमकी देऊन आपल्याला मारहाण करतो, असे संजनाने आपल्यासह काका व तिच्या मोठ्या भावाला सांगितले होते. प्राथमिक तपास व तक्रारीवरून पोलिसांनी सोहमविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.