वर्षभर प्रेमसंबंध ठेवल्यानंतर अचानक ‘ब्रेक अप’ करणाऱ्या तरुणीच्या घरात प्रियकर चाकू घेऊन घुसला. प्रेमसंबंध कायम न ठेवल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. प्रतापनगर पोलिस तत्काळ घटनास्थळावर पोहोचले आणि त्याला अटक केली. संजू गिरीजाशंकर तिवारी (१८) रा. रामेश्वरी, शताब्दी चौक असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

आरोपी संजू तिवारी हा पूर्वी तरुणीच्या घराशेजारी भाड्याने राहात होता. शेजारी असल्याने तिची संजूशी ओळख होती. दोघे एकमेकांशी बोलतही होते. दोघांत मैत्री झाली. दोघांचे सूत जुळले. त्यांचे प्रेमसंबंध जवळपास वर्षभर चालले. मात्र, तरुणीची आणखी एका तरूणाशी मैत्री झाली. त्यामुळे चिडलेल्या संजूने तिची समजूत घातली. त्या युवकाचा नाद सोडण्याची विनंती केली. मात्र, तरुणीने त्यालाच उलटसुलट बोलत प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिला. दरम्यान तो दुसरीकडे राहायला गेला. अधून मधून तो मोबाईलवर तिच्याशी बोलत होता. मात्र, ती दुर्लक्ष करायची. दरम्यानच्या काळात त्याने तिचा नाद सोडला. परंतु, त्याचे मन मानायला तयार नव्हते. त्याने अलिकडेच तिला महाविद्यालयात ये-जा करताना पाहिल्यानंतर तो पुन्हा प्रेम करायला लागला. तो तिचा पाठलाग करीत होता. मोबाईलवर तिच्याशी बोलत होता.

Domino Effect Crash Sudden Scooty Brake Causes Multi-Vehicle Pileup Internet Reacts WATCH
“वो स्त्री है कुछ भी कर सकती है…” भररस्त्यात दुचाकीस्वार काकूंनी अचानक मारला ब्रेक, एकमेकांना धडकल्या मागून येणाऱ्या गाड्या, विचित्र अपघाताचा Video Viral
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Case filed against women who brutally beat three-year-old son
तीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या आईविरोधात गुन्हा
Delhi Police
Crime Story : सावत्र मुलीचं अपहरण अन् तिच्याबरोबरच थाटला संसार; हादरवून टाकणाऱ्या घटनेचा शोध दिल्ली पोलिसांनी चार वर्षांनी कसा घेतला?
Ajit Rajgond sentenced to six days in forest custody may have hunted ten tigers in 11 years
बहेलियांकडून दहा वाघांची शिकार ! ७० लाखांचा व्यवहार !
Girlfriend murder boyfriend, Pimpri-Chinchwad, murder ,
पिंपरी-चिंचवड: प्रेयसीने मित्रांच्या मदतीने प्रियकराची केली हत्या; प्रियकर निघाला ‘बीड’चा!
Woman stabbed to death with scissors over family dispute in Kharadi area Pune news
पुणे: कौटुंबिक वादातून महिलेवर कात्रीने वार करुन खून; खराडी भागातील घटना, पती अटकेत
Nagpur, Love marriage, husband and wife ,
नागपूर : प्रेमविवाहानंतर ४,९४७ पती-पत्नीच्या संसारात विघ्न; भरोसा सेलकडून नवविवाहित दाम्पत्यांचे….

हेही वाचा >>>“कितीही काळ्या मांजरी आडव्या आल्या तरी नागपुरातील सभा होणारच” खासदार विनायक राऊत म्हणाले, “चंद्रकांत पाटलांना सत्तेची मस्ती…”

मात्र, तिने ब्रेक अप झाल्याचे सांगून त्याला नकार दिला. त्याची तक्रार मुलीने घरच्यांकडे केली. तिच्या आईने त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि या त्रासाची माहिती दिली. चिडलेल्या संजू तिवारी हा सोमवारी रात्री अकरा वाजता चाकू घेऊन तरुणीच्या घरी गेला. शिविगाळ करून तिच्या चारित्र्याबाबत बोलत होता. त्याने तरुणीला चाकू दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. तो पळून जात असतानाच पाठलाग करून त्याला पकडले.

Story img Loader